बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता त्याने कोणता फोटो किंवा व्हिडीओ नाही तर एक ट्वीट करत सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे.
राजकुमार रावने ट्विटरवर ट्वीट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. “तुम्हाला नवीन शहरात नवीन घर घेण्याची इच्छा असेल, तर काय केले पाहिजे. काही कल्पना आहे का?” , असा प्रश्न राजकुमारने विचारला आहे. त्याच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी त्याला भन्नाट सल्ले दिले आहेत.
Agar kisi ko naye sheher main naya ghar lene ka khayal aaye to kya karen? Any idea?
— Rajkummar Rao (@RajkummarRao) January 25, 2021
” नवीन शहरात जाऊन नवीन घर पाहून घेतल पाहिजे,” असं एका युजरने म्हटलं आहे. तर, ” घर शोधा आणि काय”, असं अन्य एक नेटकरी म्हणाला आहे. यात तिसरा नेटकरी म्हणाला की, “मनोज वाजपेयी आणि तुम्ही एकत्र बोलून घ्या.”
Ghr dhundhe or kya krenge..
— Urvashi Gaur (@Take_it_eezee) January 25, 2021
@BajpayeeManoj आँप दोनो एक बार बाफ करो
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sujan khatiwada (@khatiwadasujan3) January 25, 2021
Apne Bandra wale ghar ke liye buyers dhoond raha hoon. Koi ho toh batana.
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) January 25, 2021
आता या ट्वीटला अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ट्वीटशी जोडण्यात येत आहे. मनोज वाजपेयी यांनी राजकुमार हे ट्वीट करण्याच्या काही काळ आधी एक ट्वीट केलं होतं की, ” माझ्या बांद्रा येथील घरासाठी खरेदीदार शोधत आहे. कोणी असेल तर सांगा.” अशा आशयाचं ट्वीट मनोज वाजपेयी यांनी केलं होतं. या दोघांचे हे ट्वीट पाहिले तर हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण मनोज वाजपेयी यांची आगामी वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ याच्या प्रमोशनसाठी हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो असं म्हटलं जात आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.