scorecardresearch

Premium

नेटकऱ्यांंनी ट्रोल केल्यानंतर राजकुमार रावला पत्नीचा ‘तो’ फोटो करावा लागला डिलीट

राजकुमार राव आणि पत्रलेखा हे जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले.

rajkumar raj, patralekha,
राजकुमार राव आणि पत्रलेखा हे जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. राजकुमार राव हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असल्याचे दिसते. नुकताच राजकुमारने सोशल मीडियावर पत्नी पत्रलेखासोबत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

राजकुमार रावने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. हा एक मिरर सेल्फी होता. या फोटोमध्ये राजकुमार त्याची पत्नी पत्रलेखासोबत दिसत आहे. पत्रलेखा ही आरश्यासमोर बसली असून राजकुमार तिचा फोटो काढत असल्याचे या फोटोतून दिसत आहे. दरम्यान, हा फोटो शेअर केल्यानंतर राजकुमारला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यानंतर त्याने हा फोटो सोशल मीडियावरून हा फोटो डिलीट केल आहे.

rinku rajguru kedarnath
इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर रिंकू राजगुरु पोहोचली केदारनाथला, कॅप्शन चर्चेत
sukanya mone visit cm eknath shinde home
“मी तुमची पूर्वीपासून चाहती” मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ शब्द ऐकताच सुकन्या मोने सुखावल्या; सांगितला ‘वर्षा’वरील अनुभव
jitendra kapoor chawal memories
गिरगावातील खोली विकून कुलाब्यात फक्त ८ हजारांत घेतलेलं घर, जितेंद्र यांनी सांगितली आठवण; म्हणाले, “इंग्रजी ब्रँडचा पंखा…”
trisha krishna
साऊथ सुपस्टार त्रिशा कृष्णन लवकरच बांधणार लग्नगाठ? चर्चांना उधाण

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणेते नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

राजकुमार आणि पत्रलेखा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ते लग्न बंधनात अडकले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajkumar rao shares his wife patralekhas photo he got trolled and deletes the photo dcp

First published on: 27-01-2022 at 13:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×