अभिनेता राजकुमार राव अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत सप्तपदी घेतली. या दोघांनी काल सोमवारी १५ नोव्हेंबरला लगीनगाठ बांधली. राजकुमार रावने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबत त्याने एक रोमँटिक पोस्टही लिहिली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहे. यातील पहिल्या फोटोत राजकुमार राव आणि पत्रलेखा एकमेकांचा हात पकडून डोक्याला डोकं लावून फार गोड हसताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत राजकुमार राव हा पत्नी पत्रलेखाच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. हे दोन फोटो पोस्ट करताना त्याने एक रोमँटिक कॅप्शनही दिले आहे. “अखेर ११ वर्षाचे प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मजामस्तीनंतर मी माझ्या आत्मा, चांगला मित्र, माझे कुटुंब आणि माझं सर्व काही असलेल्या व्यक्तीसोबत मी लग्न केले. आज मला तुझा पती म्हणण्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही. फक्त आजसाठी नाही तर कायमचं आणि त्यानंतरही,” असे त्याने हे फोटो पोस्ट करताना म्हटले आहे.

पत्रलेखाकडून लग्नाच्या ओढणीवर राजकुमारसाठी खास संदेश, जाणून घ्या काय आहे नेमका अर्थ?

तर पत्रलेखानेही तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे दोन ठराविक फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटोत पत्रलेखा आणि राजकुमार एकमेकांचा हात पकडून हसताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत राजकुमार हा डान्स करण्याच्या स्टाईलमध्ये दिसत असून त्याच्या मागे पत्रलेखा हसत असल्याचे दिसत आहे. राजकुमार प्रमाणे तिने देखील या फोटोंना हटके कॅप्शन दिले आहे. “मी आज माझ्या सर्वच गोष्टींसोबत लग्न केले आहे. माझे प्रेम, माझा क्राईम पार्टनर, माझे कुटुंब. गेल्या ११ वर्षातील माझा सर्वात चांगला मित्र. तुझी पत्नी होण्यापेक्षा मोठी कोणतीही भावना नाही. आमच्यासाठी कायमचे,” असे त्याने यात म्हटले आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा ‘या’ अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, एका रात्रीचे भाडे माहितीये का?

दरम्यान राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा साखरपुडा १३ नोव्हेंबरला पार पडला. यानंतर १४ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्हीही कार्यक्रमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकुमार राव यांच्या साखरपुड्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाची थीम ठेवण्यात आली होती. यावेळी त्याने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज केले आणि अंगठी घातली.