आपल्या अभिनयाने लोकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता म्हणून राजपाल यादवला ओळखले जातात. राजपाल यादव हा त्याच्या उत्कृष्ट कॉमेडीसाठी ओळखला जातो. एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून तो घराघरात प्रसिद्ध आहे. मात्र सध्या राजपाल हा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. राजपाल यादवला २० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नोटीस बजावण्यात आली आहे. इंदोर पोलिसानी राजपाल यादवला याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात त्याला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमधील बिल्डर सुरिंदर सिंग यांनी राजपाल यादवविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राजपाल यादवने माझ्या मुलाला सिनेृष्टीत पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर पाठिंबा देण्यासाठी २० लाख रुपये घेतले होते. मात्र आतापर्यंत राजपाल यादवने माझ्या मुलाला कोणतेही काम मिळवून दिलेले नाही. तसेच त्याला सिनेसृष्टीत काम करण्यासाठी कोणती मदतही केलेली नाही.

“त्यावेळी फक्त हसण्यासाठी आम्हाला ५०० रुपये मिळाले होते”, राजपाल यादवने सांगितला ‘तो’ किस्सा

यानंतर त्याला पैसे परत करण्यास सांगितले असता तो गायब झाला. याप्रकरणी राजपाल आपला फोन उचलत नाही. तसेच तो पैसे देखील परत करत नाही, असा आरोप त्या बिल्डरने केला आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून त्या बिल्डरने इंदोरमधील तुकोगंज पोलिसात तक्रार दिली.

याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे. त्यानंतर पोलिसांनी राजपालला येत्या १५ दिवसात पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करत असलेले उपनिरीक्षक लालन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरिंदर सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणाची तक्रार दिली होती. याच आधारे राजपाल यादवला नोटीस बजावण्यात आली असून येत्या १५ दिवसात उत्तर द्यावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

‘तारक मेहता…’ मधील ‘जेठालाल’च्या भूमिकेसाठी राजपाल यादवने दिला होता नकार, म्हणाला…

दरम्यान राजपाल यादव हा काही दिवसांपूर्वी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात दिसला होता. यात त्याने छोटा पंडितची भूमिका साकरली होती. यापूर्वीही त्याने ‘भूल भुलैया’मध्ये छोटा पंडितची भूमिका साकारली होती. तसेच तो ‘अर्ध’ चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसला होता. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajpal yadav accused of cheating of 20 lakhs indore police issued notice against the actor nrp
First published on: 02-07-2022 at 12:26 IST