राजपालने ट्विटरवर त्याच्या मोठ्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राजपालची मोठी मुलगी दिसत असून तिने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे. ज्यावर बिग सिस्टर असं लिहीलं आहे.
‘नवरात्रीचा उत्साह वाढविण्यासाठी माझ्या घरी खऱ्याखुऱ्या देवीचं आगमन झालं आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माझ्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे आता माझी लाडकी लेक हनी यादव ताई झाली आहे’, असं कॅप्शन राजपालने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, लेकीच्या आगमनामुळे यादव कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राजपाल चंदीगढ अमृतसर चंदीगढ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.