scorecardresearch

शुद्धीवर आल्यानंतर पत्नीशी फक्त चारच शब्द बोलू शकले होते राजू श्रीवास्तव; तेच ठरले अखेरचे

Comedian Raju Srivastava Death : उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी पत्नीशी साधला होता संवाद

शुद्धीवर आल्यानंतर पत्नीशी फक्त चारच शब्द बोलू शकले होते राजू श्रीवास्तव; तेच ठरले अखेरचे

लोकप्रिय विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं आज २१ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना व फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनाही धक्का बसला आहे. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हापासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. तब्बल ४० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५८ वर्षांचे होते.

Raju Srivastava Passes Away: राजू श्रीवास्तव यांचा अखेरचा मिमिक्री व्हिडीओ होतोय व्हायरल

काही दिवसांपूर्वीच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची बातमी समोर आली होती. विविध उपचार करत डॉक्टरांनी राजू यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काही क्षणासाठी राजू शुद्धीवर आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीशी संवाद साधला होता. या संवादात ते फक्त चारच शब्द बोलले होते. तेच शब्द त्यांचे अखेरचे शब्द ठरतील, याची कल्पना कदाचित त्यांच्या कुटुंबियांनीही केली नसेल.

Photos: राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने वाचवला होता आईचा जीव; जाणून घ्या शौर्य पुरस्कार विजेत्या अंतरा श्रीवास्तवबद्दल

डीएनएच्या रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या खास मित्रांपैकी एक अशोक मिश्रा यांनी सांगितले होते की, जेव्हा राजू शुद्धीवर आले होते तेव्हा ते त्यांच्या पत्नीला फक्त चारच शब्द बोलू शकले होते. कारण ते बराच काळ बेशुद्ध होते आणि त्यांना काहीही खाता-पिता येत नव्हतं आणि नीट बोलताही येत नव्हतं. त्यावेळी पत्नी शिखाला समोर पाहून ते ‘होय, मी ठीक आहे’ एवढेच चार शब्द बोलले होते. त्यानंतर शिखा यांनी तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. यानंतर त्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीचे अपडेट माध्यमांना दिले होते आणि चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

Raju Srivastav Net Worth : अलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती किती?

१९८० च्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात सक्रिय असलेले राजू श्रीवास्तव यांनी २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ (रिमेक) आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. काही काळ समाजवादी पक्षाचा भाग राहिल्यानंतर राजू यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या