scorecardresearch

“त्याचं प्रसिद्ध अभिनेत्रीशी अफेअर असतं तर…” राखी सावंतचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशाविरा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

rakhi sawant
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिने पती आदिल खानवर मारहाण, फसवणूक यांसारखे गंभीर आरोप केले होते. राखीने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती आणि त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अदिलबाबत तो सातत्याने भाष्य करत आहे. तिने पुन्हा एकदा त्याच्या कथित गर्लफ्रेंडवर टीकास्त्र सोडले आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने पती आदिल खान दुर्राणीचे त्याची कथित गर्लफ्रेंड तनु चंडेलबरोबर अफेअर असल्याचे आरोप केले होते तसेच ती आपलं वैवाहिक आयुष्य खराब करत असल्याचं राखीने म्हटलं होतं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती असं म्हणाली की “तो कुठल्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर करत असता मला अभिमान वाटला असता की मला सोडून त्याने एका मोठ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर केले मात्र शेवटी कचरा कचऱ्याजवळच जातो, कचऱ्याला कचरा खायचा असतो.” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली.

राखी सावंतचा पती आदिलवर बलात्काराचा आरोप, इराणी विद्यार्थिनीने दाखल केली तक्रार

राखी सावंतने काही दिवसांपूर्वीच आदिल खानची कथित गर्लफ्रेंड तनुच्या नावाचा खुलासा केला होता, जेव्हा ती मराठी बिग बॉसमध्ये होती तेव्हा तनु आणि आदिल रिलेशनशिपमध्ये आल्याचं तिनं म्हटलं होतं. राखीने आदिलच्या शरीरावर लव्हबाइट पाहिले होते. “तनुने माझं आयुष्य खराब केलं. तिने माझं घर उध्वस्त केलं तर तिचंही चांगलं होणार नाही. जो आपल्या पत्नीचा झाला नाही तो दुसऱ्या कोणाचाही होणार नाही.” असं म्हणून राखीने तिला शाप दिला होता.

दरम्यान मे २०२२ मध्ये राखी सावंत आणि आदिल खान यांनी लग्न केलं होतं. अनेक महिने ती दोघं विवाहबद्ध असल्याचं त्यांनी लपवलं होतं. गेल्या महिन्यातच राखीने आदिलशी लग्न केल्याचे जाहीर केलं. तर आता राखीने आदिलपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 18:49 IST