Video: ‘तुझा नवरा भाड्याने आणलास’, राखी सावंत आणि अभिजीत बिचुकलेमध्ये जबरदस्त राडा

बॅग फेकली, केस ओढले, बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले आणि राखी सावंतमध्ये राडा

rakhi sawant, rakhi sawant video, abhijit bichukale, abhijit bichukale fight,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. या शोमध्ये सतत स्पर्धकांमध्ये भांडणे आणि वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस १५’मध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून अभिजीत बिचुकले, राखी सावंत आणि तिचा पती रितेश, देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मि देसाई यांची एण्ट्री झाली. त्यानंतर राखी, रितेश आणि अभिजीत यांच्यामध्ये चांगला बाँड असल्याचे पाहायला मिळाले. पण आता राखी आणि अभिजीतमध्ये चांगलेच भांडण झाल्याचे दिसणार आहे.

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस १५च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत राखीला म्हणतो, ‘तू पती कुठन तरी शोधून आणला आहेस.’ ते ऐकून राखी प्रचंड चिडते आणि अभिजीतला म्हणते, ‘तू मला म्हणालास माझा पती भाड्याने आणला आहेस? तू भाड्याचा आहे.’

राखी आणि अभिजीतमध्ये चांगलेच भांडण होते. राखीला इतका राग अनावर होतो की ती घरात तोडफोड करताना दिसते. ती अभिजीतची बॅग फेकून देते, त्यानंतर घरातील खूर्ची जोरात तोडते. इतकच काय ती रागात अभिजीतचे केस देखील ओढते. अभिजीत आणि राखीच्या भांडणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant attack on abhijit bichukale in bigg boss 15 watch here video viral avb

Next Story
नागा चैतन्याला घटस्फोट दिल्यानंतर मी…; समांथाचा धक्कादायक खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी