Rakhi Sawant Talks About Nana Patekar : राखी सावंत सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा अंतिम भाग नुकताच प्रदर्शित झाला. राखी यामध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेली. तिने यावेळी अनेकांचं लक्ष वेधलं आणि अनेकदा राखी वादाच्या भोवऱ्यातही अडकली. राखी अनेकदा तिची मतं, प्रतिक्रिया ठामपणे व्यक्त करत असते. 

राखीने बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत घरातील स्पर्धक आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांबद्दलची तिची मतं व्यक्त केली. यामध्ये प्रियांका चोप्रा, आमिर खान ते नाना पाटेकर यांचा समावेश आहे. राखीने या सेलिब्रिटींबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने नाना पाटेकरांबद्दल विचारल्यानंतर एका शब्दात उत्तर दिलं. नाना पाटेकर हिंदी  व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या अनेक भूमिका,त्यातील संवाद आजही हिट आहेत. त्यामुळे आता राखी त्यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…

नाना पाटेकरांबद्दल राखी सावंत काय म्हणाली?

फिल्मी ग्यानला दिलेल्या मुलाखतीत राखीला मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांबद्दल विचारल्यानंतर तिने त्यांच्याबद्दलची तिची मतं व्यक्त केली.  यावेळी तिला नाना पाटेकर यांच्याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “सभ्य व्यक्ती. ते खूप सभ्य आहेत.”

राखीला पुढे आमिर खानबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “प्ले बॉय. किती लग्न करत आहेत. त्यांना कोणी थांबवत नाहीये. किती उर्जा आहे त्यांच्यामध्ये. आमिरजी किती लग्न करत आहात.” आमिर खान व नाना पाटेकर यांच्यानतंर अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौत यांच्याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “राजकारणी. ती राजकीयदृष्ट्या बोलते. ती राजकारणी आहे.” राखीने यावेली उर्वशी रौतेला तिची नक्कल करते असंही म्हटलं आहे.

राखीने याच मुलाखतीत अभिनेता आणि बिग बॉस मराठी सीझन सहाचा उपविजेता राकेश बापटबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.राकेशबद्दल ती म्हणाली, ” राखी राकेशबद्दल म्हणाली, “एकतर्फी प्रेम केल्याचा मला खूप पश्चाताप होत आहे. त्याने माझा खूप अपमान केला पण, आता मला अपमान झाल्यानंतर वाईट वाटतच नाही. इतक्या लोकांनी माझा अपमान केला आहे की, मला काही फरकच पडत नाही. मला त्याची सवय झाली आहे.”

राकेश बापटबद्दल राखी पुढे म्हणाली, “तो कमिटेड आहे त्याची गर्लफ्रेंड आहे. आमचा लग्नाचा कोणाताही विचार नाहीये. त्याने मला आतमध्येच सांगितलं होतं की राखी वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावर मी म्हटलेलं तू तुझं बघ मी माझं बघेन. मला तू आवडतोस. त्याने मला सांगितलं की राखी मी रिलेशनशिपमध्ये आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे. ती पुण्यात राहते. हे करमणुकीसाठी नव्हतं. तसं असतं तर मी घराबाहेर आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलले नसते. मला तो आवडला. हे माझं एकतर्फी प्रेम आहे.”