scorecardresearch

“आम्ही सगळे टेन्शनमध्ये…” राखी सावंतच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

राखी सावंतच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल तिच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही सगळे टेन्शनमध्ये…” राखी सावंतच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया
राखी सावंत-आदिल दुर्रानी (फोटो – सोशल मीडिया)

ड्रामा क्वीन राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं आहे. लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने आदिलशी लग्न केल्याचा खुलासा केला आहे. इस्लामनुसार लग्न केल्यानंतर राखी सावंतने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं होतं. तसेच आदिलनेच आपल्याला लग्न लपवून ठेवण्यास सांगितलं होतं, असा खुलासाही तिने केला होता. दरम्यान, राखीच्या या आंतरधर्मीय लग्नाबद्दल तिच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.

“१०-१२ दिवस…”; राखी सावंतशी लग्नाबद्दल आदिल खानची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्रीनेही केला नवीन खुलासा

‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, राखीचा भाऊ राकेशने एका मुलाखतीत सांगितले की, “मला त्यांच्या लग्नाबद्दल फार माहित नाही, ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. नवरा बायको यांच्यातली ही गोष्ट आहे. पण जर राखीने लग्न केले असेल तर तिने खूप विचार करून हा निर्णय घेतला असेल. खरं तर आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत, राखी सर्वात लहान आहे आणि तिने आयुष्यभर खूप दु:ख सोसले आहे. मागच्या वेळी बिग बॉसमध्ये रितेशने देखील तिचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि राखीला त्याचं खूप वाईट वाटलं आणि त्रास झाला, त्यामुळे राखीने यावेळी लग्न केलंय, तर ती खूश राहावी.”

राखी सावंत प्रेग्नेंट? खुलासा करत म्हणाली “मी सिंगल मदर…”

दरम्यान, राखीने लग्नाची बातमी सर्वांना दिली आहे. तिने फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहेत. पण आदिल खान मात्र अजूनही लग्नाबदद्ल मौन बाळगून आहे. आपण इतक्यात लग्नाबद्दल काहीच बोलणार नसल्याचं आदिल म्हणाला. तर, राखी मात्र आणि आदिल नवरा-बायकोप्रमाणे राहत असल्याचं म्हणत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 12:07 IST

संबंधित बातम्या