लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) गळफास घेत आत्महत्या केली. हॉटेलमधील रुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. आकांक्षाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यात आकांक्षाच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूनंतर तिचा कथित बॉयफ्रेंड समर सिंहवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री राखी सावंतने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच राखी सावंतने आकांक्षा दुबेच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली. विरल भय्यानीने याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी राखी सावंतने तिच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केला आहे.
आणखी वाचा : Akanksha Dubey Suicide : १७ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण, २५ व्या वर्षी आत्महत्या; कोण आहे आकांक्षा दुबे?
“एका मुलीने आत्महत्या केली हे ऐकून फार दु:ख झाले. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून मला धक्काच बसला. मला अजूनही या धक्क्यातून सावरता येत नाही. मी तिचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले. तिचे व्हिडीओ-फोटो सर्व गोष्टी मी पाहिल्या. आकांक्षा आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या एका व्हिडीओत रडत होती. याचा अर्थ नक्कीच काहीतरी झाले आहे. तुम्हाला वाटतं का की ही आत्महत्या आहे.
मी पण प्रेम केले होते. पण मी फारच खंबीर आहे. त्यामुळेच मी असे पाऊल उचलले नाही. मी माझ्या जीवनासाठी लढले आणि मला देवाने न्याय मिळवून दिला आहे”, असे राखी सावंत म्हणाली.
आणखी वाचा : Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था
दरम्यान आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येसाठी तिच्या आईने भोजपुरी गायक समर सिंहला जबाबदार धरलं आहे. समर आणि त्याच्या भावाने अभिनेत्रीची हत्या केल्याचा दावा अभिनेत्रीची आई मधू यांनी केला आहे. समर सिंह हा रविवारपासून बेपत्ता आहे. एसीपी सारनाथ ज्ञानप्रकाश राय यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.