करोना आणि रामदेव बाबा सारखेच; राखी सावंतने केली तुलना

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

rakhi-sawant-compares-coronavirus-to-ramdev-baba
करोना हा रामदेव बाबांसारखे आहेत म्हणतं राखीने करोना आणि रामदेव बाबांची तुलना केली आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंत ओळखली जाते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे राखी सतत चर्चेत असते. दमनमध्ये सुरु असलेले ‘इंडिय आयडल १२’चे शूटिंग संपवून राखी मुंबईत परत आली आहे. आता राखीने करोनाची तुलना ही योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी केली आहे.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. राखीने पोल्का डॉटचा काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. “अरे देवा, हा करोना आहे ना…करोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. करोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो,” असे राखी म्हणाली. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या काही दिवसांपासून योगगुरू रामदेव बाबा देखील सतत चर्चेत आहेत. अ‍ॅलोपथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोविड-१९ बरा होतो, असा दावा त्यांनी केला होता. यामुळे डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जातं आहे.

आणखी वाचा : ‘कधी मुलगी बघितली नाही का?’ एकटक बघणाऱ्या व्यक्तीवर राखी संतापली

दरम्यान, या आधी राखी एका रस्त्यावरच्या माणसाला फटकारल्यामुळे चर्चेत आली होती. “काका तुम्ही जा. मी मुलाखत देत आहे. तुम्ही काय बघतं आहात? मुलगी कधी बघितली नाही का? पुढे जाना,” असे राखी बोलते. त्यानंतर ते काका राखीकडे बघत तिथून दुचाकी घेऊन निघाले आणि त्यांचा अपघात होणार तेवढ्यात राखी म्हणाली, “माझ्याकडे नाही तिकडे बघा नाही तर अपघात होईल तुमचा.” राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant compares coronavirus to ramdev baba says kabhi aata hai kabhi chhup jata hai kabhi bahar niklta hai dcp