scorecardresearch

“आई.. तो मला मारणार”, राखी सावंतने फोडला टाहो; पती आदिल खानला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर म्हणाली, “मी इस्लाम..”

आदिल खान दुर्रानीला सत्त न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर राखी सावंतने आईचे नाव घेत टाहो फोडला.

rakhi sawant crying
राखी सावंतचा पती आदिल खान पोलीस कोठडीत

ड्रामा क्विन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या तिच्या कौटुंबिक कहलासाठी चर्चेत आहे. पती आदिल खान दुर्रानीवर तिने मारहाण आणि फसवणुकीचे आरोप केले होते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये दिंडोशी सत्र न्यायालयाने आदिल खानला पोलीस कोठडी दिल्याबद्दल राखी सावंतने आनंद व्यक्त केला. तसेच आईच्या नावाने टाहो फोडत आदिल खानवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले.

राखी सावंत म्हणाली की, मी देवाचे आभार मानते की, “आज त्याला पोलीस कोठडी दिली. आता थेट आर्थर रोड तुरुंगात जाणार. मी देवाला एवढंच सांगने की त्याला जामीन मिळू नये. नाहीतर तो मला मारून टाकेन. मला त्याची भीती वाटते.आई…”, असे म्हणत राखी सावंतने न्यायालयाच्या बाहेरच टाहो फोडला. यावेळी आदिल खानत दुर्रानीच्या तक्रारींचा पाढाच तिने माध्यमांसमोर वाचून दाखविला. “आदिलने लग्न करुन मला इस्लाम धर्म कबूल करायला लावला. मी इस्लाम घेतला तरिही तो मला घटस्फोट द्यायला निघालाय. एका बाईसोबत तुम्ही (लोकांना उद्देशून) लग्न करता, तिचं आयुष्य उध्वस्त करता आणि नंतर तिहेरी तलाक देता. असं नाही होणार. मी त्याला घटस्फोट देणार नाही. माझ्या आयुष्याशी त्याला खेळू देणार नाही.”, अशी प्रतिक्रिया राखी सावंत हीने दिली.

“समाजात महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. हुंड्यासाठी छळ केला जातो. माझ्यासोबतही असेच झाले. लग्नाच्या आठ महिन्यानंतरही मी शांत होते. पण जेव्हा त्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु झाले, तेव्हा माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. मी आदिलला सांगितले की, त्या बाईला सोड. पण तो म्हणाला की मी त्याला सोडू शकत नाही. मग मीही म्हणाले की, तू तिला सोडू शकत नाही, तर मी तुला आता सोडणार नाही.”, असा इशाराच राखी सावंतने आदिलला दिला.

आदिल खान विरोधात म्हैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

आदिल खानच्या विरोधात म्हैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. ही विद्यार्थिनी आणि आदिल खान डेझर्ट लॅब फूड अड्डामध्ये पहिल्यांदा भेटले होते. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. नंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 19:32 IST
ताज्या बातम्या