दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामी सामी’ ही गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली आहेत. या गाण्यांवर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने सामी सामी गाण्यावर व्हिडीओ करुन शेअर केला आहे.
राखी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आता राखीने ‘पुष्पा’ चित्रपटातील सामी सामी गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. राखीने गायक अफसाना खानच्या लग्नात हा डान्स केला आहे.
Video: मध्यरात्री विमानतळावरच चक्क डान्स करु लागली समांथा रुथ प्रभू
अफसाना खानने १९ फेब्रुवारी रोजी लग्न केले. त्याच्या लग्नाला राखी सावंतसोबतच हिमांशी खुराना, उमर रियाज, रश्मि देसाई, अक्षरा सिंह आणि डोनल बिष्ट या कलाकारांनी हजेरी लावली. त्यांचे लग्नात मजामस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहेत.
‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.