scorecardresearch

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच राखी सावंतची पतीसोबत डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल

राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांच्या डिनर डेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

rakhi sawant, rakhi sawant husband, rakhi sawant husband ritesh, bigg boss 15, rakhi sawant dinner date, rakhi sawant video, राखी सावंत, राखी सावंत बिग बॉस, बिग बॉस १५, राखी सावंतचा पती, राखी सावंत व्हिडीओ
राखीनं इन्स्टाग्रामवर तिच्या डिनर डेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बिग बॉस १५ च्या महाअंतिम सोहळ्याला आता अवघे ४ दिवस बाकी आहेत. त्याआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. याबाबत राखी सावंतनं स्वतःच एका व्हिडीओमधून माहिती दिली आहे. यासोबत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत तिचा पती रितेशसोबत डिनर डेटला जाताना दिसली. राखीनं इन्स्टाग्रामवर तिच्या डिनर डेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

राखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती पती रितेशसोबत डिनर एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखीनं बिग बॉसच्या घरात असताना रितेशची खूप आठवण आल्याची कबुली दिली आहे. यासोबतच या व्हिडीओमध्ये तिने रितेशची झलकही दाखवली आहे. राखी सावंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

याआधी राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एका जिमच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सशी बोलताना तिने आपण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं होतं. त्यावर काही फोटोग्राफर्सनी तिला, ‘बिग बॉसचा विजेता कोण होणार?’ असा प्रश्न विचारला होता आणि यावर राखीनं ‘मला माहीत नाही की विजेता कोण होईल’ असं उत्तर दिलं होतं.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं तिच्या पती बद्दल वक्तव्य करताना, ‘त्याने जर मला लग्नाचं प्रमाणपत्र दिलं तर त्यांच्यासोबत पुढच्या आयुष्याचा विचार करेन अन्यथा आम्ही वेगळं होणंच योग्य आहे.’ असं म्हटलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पण आता या दोघांमधील बॉन्डिंग पाहता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे असंच दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant dinner date with husband ritesh after out from bigg boss 15 house mrj

ताज्या बातम्या