scorecardresearch

“मूर्ख, हे करण्यापेक्षा…” ‘पठाण’च्या गाण्यावर रील बनवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राखी सावंत झाली ट्रोल

आई हॉस्पिटलमध्ये असताना देखील राखीला ‘पठाण’च्या गाण्यावर रील बनवणं सुचतंय हे नेटकऱ्यांना चांगलंच खटकलं.

“मूर्ख, हे करण्यापेक्षा…” ‘पठाण’च्या गाण्यावर रील बनवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राखी सावंत झाली ट्रोल

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. एकीकडे गेले काही दिवस ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती तर दुसरीकडे तिची आई हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्याने आईला लवकर बरं वाटावं यासाठी ती प्रार्थना करताना दिसत आहे. ती तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातानाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता अशातच तिने ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावर रील बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती शाहरुखबद्दल प्रेम व्यक्त करत त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी “मी ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावर मी लवकरच एक रील बनवणार आहे,” असं म्हणताना दिसत आहे. आई हॉस्पिटलमध्ये असतानादेखील तिला ‘पठाण’च्या गाण्यावर रील बनवणं सुचतंय हे नेटकऱ्यांना चांगलंच खटकलं. आता यावरून नेटकरी तिची चांगलीच शाळा घेत आहेत.

आणखी वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

एका रिपोर्टरने तिला ‘पठाण’बद्दल प्रश्न विचारला असता राखी सावंत म्हणते, “‘पठाण’साठी खूप खूप शुभेच्छा शाहरुख जी. मला माफ करा मी ‘पठाण’च्या नवीन गाण्यावर मी रील बनवू शकले नाही. माझी आई हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्यामुळे मला रील बनवणं शक्य झालं नाही. मी काहीही करून उद्या ‘पठाण’च्या गाण्यावर एक रील पोस्ट करेन. ‘पठाण’ सुपरहिट आहे.” त्यासोबतच ती तिच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या तिच्या आईलादेखील शाहरुख खानला आशीर्वाद देण्याची विनंती करते.”

हेही वाचा : “चांगली संधी वाया घालवली…” ‘ए वतन मेरे वतन’च्या टीझरमुळे सारा अली खान ट्रोल

या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “पठाणच्या गाण्यावर व्हिडीओ कर राखी, नाहीतर शाहरुख खान जेवणार नाही.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हिला कोणीतरी थांबवा. ड्रामा करण्याची सुद्धा एक मर्यादा असते.” एका नेटकऱ्याने लिहिलं, “आई आजारी असल्यामुळे ही स्वतःकडे किती लक्ष वेधून घेत आहे मूर्ख.” तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, “रील बनवू नकोस…आईची काळजी घे. शाहरुख खानचीही हीच इच्छा असेल.” आता तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 12:22 IST

संबंधित बातम्या