मनोरंजन विश्वातली ड्रामा क्वीन म्हणून लोकप्रिय ठरलेली राखी सावंत कायमच चर्चेत असते. ‘बिग बॉस’च्या दोन पर्वात राखीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. त्याचसोबत सोशल मीडिया असो किंवा एखादा इव्हेंट राखीच्या कायम चर्चा असतात. राखी सांवत तिच्या लग्नामुळे देखील चर्चेत आली होती. राखीने २०१९ सालामध्ये बिझनेसमन रितेशसोबत लग्न गाठ बांधली होती. राखीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र राखीने या फोटोतून पतीचा फोटो क्रॉप केला होता. लग्न करूनही राखीचा पती समोर न आल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या.

अखेर राखी सावंतचा पती रितेश आता सर्वांसमोर येणार आहे. राखीचा पती रितेश ‘बिग बॉस १५’मध्ये सलमान खानची भेट घेणार आहे. तसचं काही वृत्तांनुसार तो या शोमध्ये झळकणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. ईटीटाइम्सच्या वृत्तानुसार बिझनेसच्या कामात व्यग्र असल्यामुळे रितेशला मागील सिझनमध्ये हजेरी लावणं शक्य झालं नव्हतं. मात्र या सिझनमध्ये तो सलमान खानची भेट घेणार आहे.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

‘बिग बॉस’च्या १४व्या सिझनमध्ये राखीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. तसचं या शोमध्ये तिने तिच्या पतीबद्दलही खळबळजनक खुलासा केला होता. रितेश आधीच विवाहित असून त्याला मुलंदेखईल आहेत. रितेश सोबत लग्न झाल्यानंतर त्याच्या पहिल्या विवाहाबद्दल आणि मुलांबद्दल कळालं असल्याचं म्हणत राखीने या गोष्टीमुळे तिला धक्का बसला असल्याचा खुलासा केला होता.