scorecardresearch

“तर मी तुमचा ‘चड्ढा ‘ उतरवेन…”, AAP नेते राघव चड्ढांवर भडकली राखी सावंत

राखीचं नाव घेतं राघव चड्ढा यांनी वक्तव्य केल्यानंतर तिने त्यांना उत्तर दिले आहे.

“तर मी तुमचा ‘चड्ढा ‘ उतरवेन…”, AAP नेते राघव चड्ढांवर भडकली राखी सावंत
राखीचं नाव घेतं राघव चड्ढा यांनी वक्तव्य केल्यानंतर तिने त्यांना उत्तर दिले आहे.

बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी त्यांच्या एका वक्तव्यात राखीचे नाव घेतेल आहे. कांग्रेस नेता नवजोत सिंह सिद्धू हे पंजाबी राजकारणाचे राखी सावंत असल्याचे वक्तव्य राघव चड्ढा यांनी केले. याविषयी कळल्यानंतर संतप्त राखीने राघव यांना चेतावनी दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले होते. हे पाहता आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाना साधत त्यांना पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटले. जेव्हा राखी सावंतला हे कळले तेव्हा तिने राघव यांना सुनावले आणि म्हणाली, “राघव चड्ढा, माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. मिस्टर चड्ढा, तुम्ही स्वतः बघा, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझे नाव हवे होते. जर तुम्ही माझ्या नावाचा वापर केलात तर मी तुमचा चड्ढा उतरवेन, असे राखीने राघव यांना सडेतोड उत्तर दिले.

आणखी वाचा : दिया मिर्झाने मुलाचा पहिला फोटो केला शेअर, कमेंट करत प्रियांका म्हणाली…

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

एवढंच नाही तर राखीने एका ट्वीटच स्क्रिनशॉर्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे ट्वीट रितेश नावाच्या व्यक्तीने केले आहे. तर त्या ट्वीटमध्ये त्या व्यक्तीने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना कोणाचे नाव खराब करू नका आणि तुमच्या नेत्यांना शिकवा. हे शेअर करत माझ्या पतीने मला पाठिंबा दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या