scorecardresearch

Rakhi Sawant Mother Died : अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

अभिनेत्री राखी सावंतची आई जया यांचे निधन झाले आहे.

rakhi sawant mother died
राखी सावंतच्या आईचे निधन

Rakhi Sawant mother Passed away : ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतची आई जया यांचे निधन झाले आहे. त्या ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने ग्रस्त होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राखी सावंतच्या आई जया या गेल्या ३ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन ट्युमरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी (२८ जानेवारी) रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखीचा पती आदिल दुर्रानी खान यांनी जया यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

नुकतंच राखी सावंतने ई टाईम्सशी बातचीत केली. त्यावेळी ती म्हणाली, “आई आता या जगात नाही. गेल्या काही दिवसांपासून ती गंभीर आजाराशी झुंज देत होती. तिच्या किडनी आणि फुफ्फुसात कर्करोग पसरला होता. त्यानंतर आज तिचे सर्व अवयव निकामी होत गेले आणि तिचे निधन झाले.” यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राखी सावंतला अश्रू अनावर झाले.

राखी सावंत ही काही आठवड्यांपूर्वी बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून बाहेर आली. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामद्वारे आईला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. यावेळी तिने “माझ्या आईला कर्करोग झाला होता. त्यानंतर आता ती ब्रेन ट्युमरने ग्रस्त झाली आहे. तिचा कर्करोग फुफ्फुसापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी राखीने चाहत्यांना तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.”

एप्रिल २०२१ मध्ये राखी सावंतच्या आईची कर्करोगाचे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आईवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर राखीने सलमान खान आणि सोहेल खान यांचे आभार मानले होते. त्यांनी राखीच्या आईच्या उपचाराचा खर्च उचलण्यास मदत केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 21:55 IST