‘तू जन्माला येताच का मेली नाहीस’; मिका सिंग KISS कॉन्ट्रोव्हर्सीनंतर राखीवर संतापली होती आई

राखीने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

rakhi sawant mother on mika singh kiss controversy
राखीने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते. राखी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी करोनावरील वक्तव्य आणि तिच्या नवऱ्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत आली होती. राखीचं संपूर्ण आयुष्य हे वादविवादाच्या अवती भोवती फिरते. त्यात सगळ्यात चर्चा झाली ती म्हणजे राखी आणि बॉलिवूड गायक मिका सिंगच्या किस कॉन्ट्रोव्हर्सीची.

राखीने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखच दिली. या मुलाखतीत राखीने तिच्या करिअर आणि या कॉन्ट्रोव्हर्सी विषयी सांगितले आहे. राखीने तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. तिला अभिनेत्री व्हायचे होते पण तिच्या कुटुंबाने साथ न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन राखीने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

“मला घरसोडून पळावे लागले होते. पण, मला खात्री आहे की आज माझे वडील जिथे आहेत तिथे त्यांना माझा अभिमान वाटत असेल. आज मी जे काही आहे ते त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आहे. आजही माझे कुटुंब मला स्वीकारत नाही,” असे राखी म्हणाली.

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

पुढे मिका सिंगसोबतच्या किस कॉन्ट्रोव्हर्सी बद्दल राखी म्हणाली, “या गोष्टीवरून माझ्या आईला खूप राग आला होता. तिने जेव्हा ही बातमी पाहिली तेव्हा तिला इतका राग आला होता की ती मला म्हणाली की तू जन्माला येताच का मेली नाहीस.”

आणखी वाचा : रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं माझ्या मेसेजची दखलही घेतली नाही – तापसी पन्नूची खंत

पुढे राखी म्हणाली, “माझी आई जेव्हा असं म्हणाली तेव्हा मी तिला इतकेच सांगितले की मी अमिताभ बच्चन किंवा अनिल कपूर यांची मुलगी नाही, जे माझ्यासाठी कोणतं मुकुट घेऊन बॉलिवूडमध्ये उभे आहेत. तुम्ही मला माझा संघर्ष करू द्या.” राखी या आधी ‘बिग बॉस १४’ मध्ये स्पर्धेक म्हणून दिसली होती. ज्यात तिने वेगवेगळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant mother on kiss controversy with mika singh my mother told me i wish you died when you were born dcp

ताज्या बातम्या