“सलमान खान आमच्यासाठी देवदूतच!” राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार

राखीची आई सध्या कॅन्सरसाठी उपचार घेत आहे.

‘बिग बॉस’ फेम राखी सावंतची आई सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. ती कॅन्सर या आजाराने पीडित आहे. तिच्यावर आज एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली. राखीने आपल्या आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सलमान खानचे आभार मानताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी तिच्या आईला काळजी न करण्याबाबत सांगत आहे तसंच तिला कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलायलाही सांगत आहे. तिची आई जया सावंत हिने सलमान खानचे आभार मानले तर तो देवदूत असल्याचंही ती सांगत आहे. ती हेही म्हणाली की सलमानचा संपूर्ण परिवार या उपचारादरम्यान तिच्या पाठीशी उभे असल्याचंही सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, “मी सलमानजींना नमस्कार करते. आमच्या जीजसकडे आम्ही प्रार्थना करत होतो की आता आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही आता काय करणार, मी अशीच मरेन का…पण माझ्या देवाने, जीजसने सलमान खानला देवदूत म्हणून आमच्याकडे पाठवले आणि माझ्यासाठी आज सलमान खान उभे राहिले, माझं ऑपरेशन त्यांच्यामुळे होऊ शकतंय. त्यांचा पूर्ण परिवार माझ्यासाठी उभा राहिला आहे. मी परमेश्वराचे आभार मानते, सलमान यांचे आभार मानते. ”

यानंतर राखीही या व्हिडिओमध्ये बोलत आहे. सलमानमुळेच आपल्या आईचे प्राण वाचल्याचंही ती सांगते. “तुम्ही आम्हाला जगातले सर्वोत्तम डॉक्टर्स उपलब्ध करुन दिले. मी प्रार्थना करते की प्रत्येक घरात तुमच्यासारख्या आणि सलमानसारख्या मुलांनी जन्म घ्यावा. मी तुमच्या परिवाराचेही आभार मानते की त्यांनी माझ्या परिवाराला दोन देवदूत दिले”, असंही ती सांगते.

याआधी राखीने सोहेल खानचेही आभार मानले होते. त्याच्यामुळे राखीच्या करियरला पुन्हा एकदा उभारी आल्याचं ती सांगते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rakhi sawant mother thanked salman khan for helping vsk

ताज्या बातम्या