“लाज वाटली पाहिजे तुम्हाला…”; राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी प्रकरणात राखी सावंतची उडी

राज कुंद्रा अटक प्रकरणात बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतची सुद्धा प्रतिकिया आलीय. या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना राखा सावंतने राज कुंद्राची बाजू घेतली आहे.

rakhi-sawant-on-raj-kundra-case

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अश्लील फिल्म बनवण्याच्या आरोपावरून मुंबई क्राइम ब्रांचने सोमवारी रात्री राज कुंद्रा याला अटक केली. राज कुंद्राला न्यायालयात हजर केल्यानंतर २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या बातमीने बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येक जण यावर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. अशातच बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतची सुद्धा प्रतिकिया आलीय. या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना राखा सावंतने राज कुंद्राची बाजू घेतली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीसोबत बोलताना राखी सावंतने ही प्रतिक्रिया दिलीय. यावेळी राखी सावंत म्हणाली, “शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे…तिचं नाव खराब करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत… राज कुंद्रा एक उत्तम व्यक्ती आहेत…त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.” राज कुंद्रा असं काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाही, असं देखील यावेळी राखी सावंतने म्हटलंय.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली, “राज कुंद्रा एक उत्तम उद्योजक आणि समाजसेवक आहेत…त्यांना कुणीतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे…शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये बरीच मेहनत घेऊन स्वतःचं नाव कमवलंय…त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे…तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांच्यावर खोटे आरोप करताना…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शिल्पाने राखी सावतंला केली होती ही मदत

राज कुंद्रा अटक प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना राखी सावंतने शिल्पा शेट्टीचं भरपूर कौतुक केलं. यावेळी राखी सावंत म्हणाली, “मला आठवतंय…राकेश रोशन यांचं ‘क्रेझी 4’ मधलं ‘तुझे टुक देखे’ या आयटम साँगसाठी सुरूवातीला शिल्पा शेट्टीवा ऑफर आली होती. जेव्हा तिने मला सांगितलं की गाणं तिला नाही करायचंय. त्यावेळी ते गाणं मला देण्यासाठी सांगितलं. त्यानंतर शिल्पा शेट्टीने राकेश रोशन यांना माझं नाव सुचवलं. ”

फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या लक्षात आले होते. त्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली. आज राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant over raj kundra case called him victim of blackmail says someone defame shilpa shetty prp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या