आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

राखीने एका मुलाखतीत आमिर आणि किरणच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

rakhi sawant on aamir khan and kiran rao divorce
राखीने आमिरला तिच्याशी लग्न करण्या विषयी काय वाटते विचारले आहे.

बॉलिवूड मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिरने घटस्फोटाची माहिती दिली आहे. ही बातमी ऐकूण त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतने त्यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राखीचा हा व्हिडीओ ‘ईटाइम्स’ने शेअर केला आहे. राखीला आमिर आणि किरणच्या घटस्फोटाच्या बातमीवर विश्वास होतं नव्हता. मात्र, त्यानंतर राखीने तिच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. ‘जेव्हा केव्हा कोणी विभक्त होतं तेव्हा तिला वाईट वाटतं’, असे राखी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

राखी पुढे म्हणाली, ‘तिने एका जुन्या मुलाखतीत आमिरला सांगितले होते की आमिरने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देत किरण रावशी लग्न केले हे तिला आवडले नाही. राखीने सांगितलेली गोष्ट आमिरने गांभीर्याने घेतली. राखी हसत पुढे म्हणाली, ‘माझं लग्न होतं नाही आहे आणि लोक घटस्फोट घेतं आहेत. आमिरजी मी आता कुमारिका आहे, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते?’

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता.

आणखी वाचा : सगळीकडे ट्राय का करतोस? केआरकेने रणबीर कपूरच्या चारित्र्यावर केला प्रश्न

किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि रीना दत्ता विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant reacts to aamir khan and kiran rao divorce and says aamir ji main kuwari hu dcp