scorecardresearch

“मी निवडणूक लढवण्याबद्दलची घोषणा मोदीजी करणार होते पण हेमा मालिनींनी…”, राखी सावंतची खोचक प्रतिक्रिया

“मी स्मृती इराणी पार्ट २ होणार आहे.”

“मी निवडणूक लढवण्याबद्दलची घोषणा मोदीजी करणार होते पण हेमा मालिनींनी…”, राखी सावंतची खोचक प्रतिक्रिया

राजकारण आणि बॉलिवूड यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, जया बच्चन यांच्यासारखे अनेक कलाकार सिनेसृष्टीच्या करिअरनंतर आता राजकीय पक्षात विविध सहभागी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत भारतीय जनता पक्षाकडून मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या सध्या मथुरा मतदारसंघातून भाजपा खासदार आहेत. “तुम्हाला मथुरेत सर्व बॉलिवूड कलाकार हवे आहेत. उद्या राखी सावंतही निवडून येऊ शकते”, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली होती. आता त्यावर अभिनेत्री राखी सावंतने खोचकरित्या प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : अनुष्का शर्माने न आवडलेले फोटो केले शेअर, एक्स बॉयफ्रेंड कमेंट करत म्हणाला…

नुकतंच पापाराझीने राखी सावंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली, “आज मी फार आनंदी आहे. मी खरंतर तुमच्यापासून सर्व गोष्टी फार गुप्त ठेवल्या होत्या. मी २०२२ मध्ये निवडणूक लढवणार आहे. याची घोषणा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह करणार होते. पण मी फार नशीबवान आहे की माझ्या हृदयाच्या फार जवळ असलेली, ड्रीम गर्ल, माझी स्वीटहार्ट, बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मी निवडणूक लढवणार असल्याची बातमी जाहीर केली.”

खरतंर मोदीजी आणि अमित शाह माझ्याबद्दल बोलणार होते. पण मोदीजी असू दे किंवा हेमा मालिनी… एकच गोष्ट आहे आणि मी स्मृती इराणी पार्ट २ होणार आहे. मी निवडणूक लढवणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. होय, मी निवडणूक लढवणार आहे. तुम्ही सगळे मला साथ द्याल ना? धन्यवाद हेमा मालिनी जी, तुम्ही माझ्यासाठी इतके छान विधान केले आहे. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद, असे राखी सावंत म्हणाली.

आणखी वाचा : ‘हा माझा बायको पार्वती’ डायलॉग नेमका कसा सुचला? अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

दरम्यान कंगना राणौत मथुरेतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवर काही दिवसांपूर्वी हेमा मालिनींनी आपली प्रतिक्रिया दिली होती. कंगना राणौत मथुरेतून लढणार असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यावर मी माझे विचार कशाला प्रकट करू, माझे विचार देवाला माहीत आहेत. मथुरेत कुणी खासदार असावं, हे भगवान श्रीकृष्ण ठरवतील.

त्यापुढे त्या म्हणाल्या, मथुरेतील ज्यांना खासदार बनायचं आहे, त्यांना तुम्ही बनू देणार नाहीत. तुम्हाला मथुरेत सर्व बॉलिवूड कलाकार हवे आहेत. उद्या राखी सावंतही निवडून येऊ शकते. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर आता राखी सावंतने टीका केली आहे. तर अनेकांनी राखीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या