‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यापासून ड्रामा क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत सतत चर्चेत आहे. बिग बॉस फेम राखी सावंतचं वैवाहिक आयुष्य नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही तिचा पती रितेशसोबत फिरताना दिसते. यानंतर आता राखीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नुकतंच राखी सावंतने ई टाईम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने रितेशसोबत लग्न करण्यपासून आई होण्यापर्यंत अनेक प्रश्नांवर उत्तर दिली. यावेळी ती म्हणाली, मी रितेशसोबत खूप आनंदी आहे. माझ्या पतीवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, याची मला कल्पना आहे. त्याच्याबद्दल जे काही सांगितलं जात आहे तसा तो नाही. मी गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्यासोबत आहे आणि मी त्याला फार चांगली ओळखते. तो बेल्जियमहून आला आणि त्यानंतर थेट ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाला. त्याने मला खूप प्रेम दिले आहे.




मी आता रितेशसोबत अधिकृतपणे लग्न करणार नाही. पण मला त्याच्यासोबत माझे भविष्य घडवायचे आहे. त्यामुळेच मला सध्या लग्न करायचे नाही. आम्ही दोघेही सध्या एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही राखीने सांगितले.
तैमूर विषयी विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नामुळे संतापली करीना कपूर खान, म्हणाली…
यापुढे ती म्हणाली, लोक काहीही म्हणतील. पण रितेश हा नवरा मटेरिअल आहे. मला एवढंच माहित आहे की तो माझ्यासाठी खूप चांगला आहे. तो एक चांगला नवरा असल्याचे सिद्ध करेल. आम्ही एक चांगले जोडपे होऊ. तसे जर सर्व काही ठीक झाले तर आम्हाला भविष्यात मुलंही होतील.
यापूर्वी एका मुलाखतीत राखीने तिच्या हनिमूनबद्दल सांगितले होते. ‘जर हे असंच चालू राहिले तर आम्ही हनिमून करु की नाही, याबद्दल मला शंका आहे. तू जर इतका लाजत राहिलास तर मला दुसरं कोणीतरी घेऊन जाईल. तेव्हा मला बोलू नकोस’, अशी अप्रत्यक्ष धमकीही राखीने त्याला दिली होती.