राखी सावंतने गुपचूप केलं लग्न? ब्राइडल लूकमधील फोटो व्हायरल

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यात आघाडीवर असलेली अभिनेत्री राखी सावंतने गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे.

rakhi sawant
राखी सावंत

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यात आघाडीवर असलेली अभिनेत्री राखी सावंतने गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे ब्राइडल लूकमधील तिचे व्हायरल झालेले फोटो. हातात फुलांचा गुच्छ आणि पांढऱ्या रंगाच्या गाऊनमधील राखीचे हे फोटो पाहून तिने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. एनआरआयसोबत राखी विवाहबंधनात अडकल्याचं म्हटलं जात होतं. पण या सर्व चर्चांवर राखीने उत्तर दिलं आहे. ‘अद्याप माझं लग्न झालेलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी मी ब्राइडल लूकमध्ये फोटोशूट केलं होतं. त्याचेच हे फोटो आहेत,’ असं ती म्हणाली.

आणखी वाचा : अवघ्या पाच वर्षांत मोडला दिया मिर्झाचा संसार, घटस्फोटानंतरही ठेवणार मैत्रीचे नाते 

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये राखीने अचानक सोशल मीडियावर स्वत:च्या लग्नाची पत्रिका पोस्ट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दीपक कलालसोबत ती लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर दीपक कलालनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून राखी सावंतला प्रपोज केले होते. मात्र हे लग्न सत्यात काही उतरलं नाही. त्यामुळे राखी सावंत कधी काय करेल याचा काही नेम नाही.

राखीनं ‘राखी का स्वयंवर’ या रिअॅलिटी शोमधून टॉरंटोमधील इलेश पारूजानवालाशी साखरपुडाही केला होता. शोमध्ये या दोघांचं लग्नही झालं असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र काही महिन्यातच राखी इलेशपासून विभक्त झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant secretly tied the knot here is what actress says about her bridal photos ssv

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या