scorecardresearch

Premium

‘सिन्टा’च्या वाद निवारण समितीच्या अध्यक्षपदी राखी सावंत

वादग्रस्त विधानांसाठी आणि वादग्रस्त कृत्यांसाठी नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा वाद घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, या वेळी मात्र वाद घालण्यासाठी तिच्याकडे सामाजिक जबाबदारी देण्यात आली आहे. ‘सिने अ‍ॅंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन’ (सिन्टा)च्या ‘वादविवाद निवारण समिती’च्या अध्यक्षपदी राखी सावंतची निवड झाली आहे.

‘सिन्टा’च्या वाद निवारण समितीच्या अध्यक्षपदी राखी सावंत

वादग्रस्त विधानांसाठी आणि वादग्रस्त कृत्यांसाठी नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा वाद घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, या वेळी मात्र वाद घालण्यासाठी तिच्याकडे सामाजिक जबाबदारी देण्यात आली आहे. ‘सिने अ‍ॅंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन’ (सिन्टा)च्या ‘वादविवाद निवारण समिती’च्या अध्यक्षपदी राखी सावंतची निवड झाली आहे. अध्यक्ष झाल्या झाल्या मालिका आणि चित्रपट निर्मात्यांबरोबर वाद घालण्याचे काम पहिल्यांदा राखीला देण्यात आले आहे.
ज्या कलाकारांना निर्मात्यांकडून पूर्ण मानधन मिळालेले नाही त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी राखी प्रॉडक्शन हाऊसेसचा सामना करणार आहे. ‘सिन्टा’च्या वादविवाद निवारण समितीची अध्यक्ष म्हणून संस्थेकडे आलेल्या तक्रारी-भांडणे मिटवणे ही तिची प्रमुख जबाबदारी असली तरी क लाकारांना मानधन मिळवून देण्याचे काम प्रामुख्याने तिला हाती घ्यावे लागणार आहे. राखीने आपण हे काम ‘सिन्टा’चे अध्यक्ष धर्मेश तिवारी यांच्या मदतीने सुरू केल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यंत विविध मालिकांच्या निर्मात्यांकडून कलाकारांना उर्वरित मानधनाची १ कोटी रूपयांपर्यंतची रक्कम मिळवून देण्यात आपल्याला यश आले असल्याचेही राखीने सांगितले.

udaynidhi stalin
संघाच्या मुखपत्रातून सनातन धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर; राजकीय पक्षांचे जाहीरनामे तपासण्याची निवडणूक आयोगाला सूचना
panvel BJP leader Paresh Thakur request DCM Fadnavis relaxation arrears property tax
थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार
chandrapur police, gambling den in chandrapur, police raid gambling den, congress workers cell president vinod sankat arrested
काँग्रेस कामगार सेल जिल्हाध्यक्ष संकत यांच्या जुगार अड्ड्यावर छापा
sansad
मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती विधेयके येणार? सरकारने जाहीर केली यादी!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant to head cine and television artistes associations committee

First published on: 12-07-2013 at 06:28 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×