scorecardresearch

“जर हे असंच चालू राहिले तर…”, राखी सावंतने पती रितेशला दिली अप्रत्यक्षरित्या धमकी

त्यानंतर आता राखीने रितेशबद्दल मीडियाकडे तक्रार केली आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यापासून ड्रामा क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत सतत चर्चेत आहे. बिग बॉस फेम राखी सावंतचं वैवाहिक आयुष्य नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही तिचा पती रितेशसोबत फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राखीचा पतीला लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राखीने रितेशबद्दल मीडियाकडे तक्रार केली आहे.

नुकंतच राखी सावंत ही तिच्या पतीसोबत कुठेतरी बाहेर फिरताना दिसत आहे. यावेळी तिच्या सोबत अभिनेता विशाल कोटियन दिसत आहे. यांचा एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विशालशी बोलताना राखी रितेशच्या गालांना स्पर्श करते आणि तो लाजतो. यावरुन विशाल राखी आणि रितेशची खिल्ली उडवतो आणि म्हणतो की, ‘मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे नाते पाहिले की जिथे नवरा लाजाळू आहे’. यावर राखी विशालला उत्तर देताना म्हणते की, “अरे मी जेव्हाही त्याच्या गालाला हात लावते, तेव्हा तो लाजतो. मी त्याच्या या कृतीला फार कंटाळली आहे.”

यानंतर राखी तिच्या हनिमूनबद्दल म्हणते की, ‘जर हे असंच चालू राहिले तर आम्ही हनिमून करु की नाही, याबद्दल मला शंका आहे. तू जर इतका लाजत राहिलास तर मला दुसरं कोणीतरी घेऊन जाईल. तेव्हा मला बोलू नकोस’, अशी अप्रत्यक्ष धमकीही राखी त्याला देते. राखीचे हे बोलणे ऐकून तिथे उभे सर्वजण जोरजोरात हसायला लागतात. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

६० मजली इमारतीवरुन उडी मारत Miss USAची आत्महत्या, मृत्यूच्या काही तासापूर्वी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान नुकतंच राखी सावंतने एका मुलाखतीत बिग बॉसवर टीका केली होती. तुम्ही मला वारंवार बिग बॉसच्या घरात बोलावून टिश्यूसारखा वापर करत आहात. मी टिश्यू पेपर नाही, मी एक जिवंत व्यक्ती आहे. जोपर्यंत तुम्हाला मनोरंजनाची गरज आहे. तेवढा वेळ तुम्ही माझा वापर करता आणि मग बाहेर काढता. याचा अर्थ म्हणजे जोपर्यंत संत्र्यामध्ये रस असेल तोपर्यंत तुम्ही ते पिळून घ्याल आणि नंतर त्याची साल फेकून द्याल. मी संत्रा किंवा टिश्यू नाही.” असे सांगत राखी सावंतने संताप व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant very upset with her husband ritesh kumar for this habit video viral nrp

ताज्या बातम्या