ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. आता ४ वर्ष जुन्या प्रकरणात, ईडीने बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, अभिनेता राणा दग्गुबती आणि इतर १० कलाकारांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, रकुल ६ सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर राहणार आहे, तर राणा दग्गुबती ८ सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर राहणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात ईडीने अनेक सेलिब्रिटींना समन्स केले आहे. रकुल प्रीत सिंह आणि राणा दग्गुबती सारख्या बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त, रवी तेजा, चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सारख्या अनेक टॉलिवूड सेलिब्रिटींनाही समन्स केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

सुत्रांनुसार २ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे सगळे सेलिब्रिटी ईडी समोर चौकशीसाठी हजर राहतील. हे ४ वर्ष जुनं प्रकरण आहे. त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाने पुराव्यांच्या अभावामुळे कलाकारांवर कारवाई केली नाही आणि सोबतच चार्जशीट देखील दाखल केले नाही.

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

जेव्हा उत्पादन शुल्क विभागाने सेलिब्रिटींची चौकशी केली तेव्हा त्यांनी या प्रकरणात नकार दिला होता. या प्रकरणात ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘तेलंगणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे १२ गुन्हे नोंदवले आणि ११ चार्जशीट दाखल केल्या आहेत. त्यानंतर ८ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली, मुख्यतः ड्रग तस्करी करणारे त्यात आहेत. आम्ही उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावले आहे. जोपर्यंत आम्हाला पुरावे मिळत नाही, तोपर्यंत टॉलीवूड सेलिब्रिटी साक्षीदार मानले जातील. कारण त्यांची नावे तपासात समोर आली आहेत.’