अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साउथ सिनेमांमध्ये तिची चांगली ओळख निर्माण केलीय. रकुलच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. बॉलिवूडमध्ये देखील रकुलने आपलं नशीब आजमवलं आहे. मात्र सध्या रकुल सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. रकुलच्या या नव्या लूकमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलंय.

काही दिवसांपूर्वीच रकुल प्रीतने तिचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती वेगळीच दिसत आहे. रकुलचं हे बदललेलं रुप पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रकुलने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा सवाल अनेकजण तिला विचारला आहे.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
PM narendra modi wears jacket made from plastic bottles and old clothes
VIDEO : “टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या अन् उरलेल्या कपड्यांपासून तयार केले अंगावरील जॅकेट”; पंतप्रधान मोदी यांनी स्वत: सांगितले
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

“महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला”; सोनाली पाटीलने तृप्ती देसाई यांच्यावर साधला निशाणा

रकुल प्रीतने शेअर केलेल्या फोटोत तिचे गाल आत गेलेले दिसत आहेत. तर तिच्या नाकातही बदल दिसून येत आहे. त्यामुळे रकुलने प्लास्टिक सर्जरी केली असल्याच्या चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, “ही कोण आहे?” तर दुसरा युजर म्हणाला, “हे काय हिने देखील प्लास्टिक सर्जरी केली. या बॉलिवूडवाल्यांना झालाय तरी काय ? चांगला चेहरा बिघडवून टाकतात.”

यापूर्वी रकुल प्रीत ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आली होती. एलएसडी आणि एमडीएमए सारख्या महागड्या अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीच्या चौकशीदरम्यान तेलुगू फिल्म इंडस्ट्रीच्या 10 सेलिब्रिटींना समन्स बजावले होते. यात रकुल प्रीतच्या नावाचा देखील समावेश होता.