scorecardresearch

Ram Charan Gifts Gold Coins: RRRच्या यशानंतर क्रू मेंबर्सना भेट म्हणून दिली ‘इतक्या’ लाखाची सोन्याची नाणी

RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

rrr, ram charan, gold coin,
RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या RRR या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. त्यानंतर राम चरणने त्याच्या क्रू मेंबर्ससोबत हा आनंद साजरा केला आहे. त्याने ज्या प्रकारणे त्याच्या क्रू मेंबर्ससोबत हा आनंद साजरा केला आहे त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. तर राम चरणने टीमला सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.

RRR च्या यशात क्रू मेंबर्सचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांच्या मेहनतीला सलाम करत, राम चरणने ३५ क्रू मेंबर्सना सोन्याची नाणी भेट दिली. नाण्यांची खास गोष्ट म्हणजे एका बाजूला राम चरणचे नाव आहे तर दुसऱ्या बाजूला RRR चे चिन्ह आहे.

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, राम चरण RRR च्या यशाने खूश होता आणि त्याने क्रू मेंबर्सना भेट देण्याचा निर्णय घेतला. त्याने ३५ क्रू मेंबर्सना हैद्राबादला स्थित असलेल्या त्याच्या घरी जेवायला बोलावले आणि सगळ्यांना मिठाईसोबत सोन्याची नाणी भेट म्हणून दिली. एवढी महागडी भेट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले, असे सांगितले जाते की प्रत्येक नाणं हे जवळपास ११.६ ग्रॅम आहे. प्रत्येक नाण्याची किंमत ही ५५ हजार ते ६० हजारपर्यंत आहे. जवळपास या सगळ्या नाण्यांची किंमत ही १९ लाखच्या जवळपास असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा : स्वत: चे आयुष्य पडद्यावर पाहताना प्रवीण तांबेंना झाले अश्रू अनावर, पाहा Video

RRR चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर राम चरण व्यतिरिक्त ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण देखील या चित्रपटात दिसले आहे. सुमारे ५५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २५ मार्च रोजी वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. राम चरण RRR मध्ये अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेत दिसला, तर ज्युनियर एनटीआरने कोमाराम भीमची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-04-2022 at 11:09 IST

संबंधित बातम्या