गेले काही दिवस ऑस्कर २०२३ मध्ये कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळणार याच्या सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. या स्पर्धेत ‘आरआरआर’ हा चित्रपट वरच्या स्थानी आहे. सध्या या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाचे नावाबरोबरच अभिनेता राम चरण याचेही नाव ऑस्कर नामांकनाच्या यादीत वरच्या स्थानावर असल्याचे कळताच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राम चरण यालाही ऑस्कर द्या अशी मागणी त्याचे चाहते करत आहेत.

हेही वाचा : “मी ठरविले आहे, यापूढे मी कोणत्याही कलाकृतीत…” अभिनेते पंजक त्रिपाठी यांनी घेतला मोठा निर्णय

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

अभिनेता राम चरण याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. त्याचे या भूमिकेसाठी खूप कौतुक केले गेले. त्याने ‘आरआरआर’मध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याचे नाव ऑस्करच्या नामांकनाच्या यादीत वरच्या स्थानी असून त्याला ‘बेस्ट अॅक्टर’ या विभागात नामांकन मिळू शकते असे ‘व्हरायटी’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकाने वर्तवले आहे. या यादीत ज्युनिअर एनटीआर याचेही नाव सामील असल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी कळताच राम चरणच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘राम चरण फॉर ऑस्कर्स’ हा हॅशटॅग वापरायला सुरुवात करून त्याला ऑस्कर देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा हॅशटॅग सोशल मिडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. तरी अद्याप ऑस्कर २०२३ ची नामांकने जाहीर झालेली नाहीत.

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक व्हरायटीनुसार, आरआरआर चित्रपटाला ‘बेस्ट ओरिजिनल सॉंग’ या विभागात ‘दोस्ती’ या गाण्यासाठी पहिले नामांकन मिळू शकते, तर ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागात ‘आरआरआर’ला दुसरे नामांकन मिळू शकते. ‘आरआरआर’ला जर ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागात नामांकन मिळाले तर ‘अर्जेंटिना १९८५’, ‘बार्डो’, ‘क्लोज’ आणि ‘होली स्पायडर’ हे चित्रपट त्याचे प्रतिस्पर्धी चित्रपट असतील. असेही ‘व्हरायटी’ या अंतरराष्ट्रीय मासिकाने म्हटले. पण अकादमी पुरस्कारांकडून ‘ऑस्कर २०२३’ च्या नामांकनांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ती यादी येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते असे बोलले जात आहे.

आणखी वाचा : ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पुढे, ‘या’ दोन विभागांत नामांकन मिळण्याची शक्यता

एस एस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींहून अधिक रकमेची कमाई केली. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार दिसले होते. दक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. त्यासोबतच या चित्रपटात बॉलीवूड स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट आणि अजय देवगणने दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.