बॉलिवूड मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. लग्नाच्या १५ वर्षांनी आमिर आणि किरणने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिरने घटस्फोटाची माहिती दिली आहे. त्यांच्या घटस्फोटाची माहिती मिळताच सोशल मीडियावर अनेकांनी आमिर आणि किरणला ट्रोल केले आहे. दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी आमिर आणि किरणची बाजू घेत ट्रोलर्सला सुनावले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करत ट्रोलर्सला सुनावले आहे. “जर आमिर खान आणि किरण राव यांना घटस्फोट घेण्यात काही अडचण नाहीये, तर इतरांना अडचण का आहे? यावरून ट्रोलर्स वैयक्तिक पातळीवर ट्रोल करण्याचा मूर्खपणा करतायत. पण ती दोघं मात्र या निर्णयात वैयक्तिकरीत्या पूर्णपणे प्रोफेशनल आहेत”, अशा आशयाचे ट्वीट राम गोपल वर्मा यांनी केले. राम गोपाल वर्मा आणि आमिरने ‘रंगीला’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता.

आणखी वाचा : शाहरुख खानने चक्क आलिया भट्टकडे मागितलं काम; रिट्विट करत म्हणाला, वचन देतो…

किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि रीना दत्ता विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.