‘मुकुल रोहतगी यांच्यासारख्या वकिलाकडे…’, आर्यन खानच्या सुटकेनंतर राम गोपाल वर्मांचे ट्वीट चर्चेत

राम गोपाल वर्मा यांनी केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

ram gopal varma, aryan khan bail,
राम गोपाल वर्मा यांनी केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सगळ्यांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय. त्यानंतर आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मांनी एक उपरोधिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केले आहे. “बऱ्याच लोकांना मुकुल रोहतगी यांच्यासारख्या वकिलाकडे केस देता येत नाही. म्हणूनच खटल्याविनाच अनेक निर्दोष तुरुंगात खितपत पडले आहेत..,” अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. राम गोपल वर्मा यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

दरम्यान, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी ते आजच तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. यानंतरच तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ram gopal varma tweets after aryan khan bail dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या