२८ वर्षानंतर कपूर कुटुंबातील ‘या’ अभिनेत्याचं पुनरागमन

आशुतोष गोवारीकर यांच्या बॅनरअंतर्गत आगामी चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. परंतु सध्या हेच कलाकार अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करताना दिसत आहेत. यातच आता तब्बल २८ वर्षानंतर कपूर कुटुंबातील नावाजलेला एक अभिनेता चित्रपटात झळकण्यास सज्ज झाला आहे.

‘फर्स्ट पोस्ट’नुसार, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटामध्ये राजीव कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या नावाचा खुलासा झालेला नाही. गेल्या २८ वर्षापासून राजीव कपूर यांनी चंदेरी दुनियेपासून फारकत घेतली होती.

राजीव कपूर यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द तसं पाहायला गेलं तर फार कमी आहे. मात्र त्यांचा काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यातील ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

दरम्यान, १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटानंतर राजीव यांनी अभिनयाला रामराम केला. मात्र त्यानंतर त्यांनी भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबत हिना या चित्रपटाची निर्मिती केली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ram teri ganga maili actor make hindi film comeback after 28 years ashutosh gowarikers