टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ बनवणाऱ्या रामानंद सागर यांची पणती फार चर्चेत असते. तिचं नाव साक्षी चोप्रा असून ती सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. ती तिच्या अतरंगी आउटफिट आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. साक्षीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने नेटचा ड्रेस घातला होता.
हेही वाचा – शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप




‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साक्षी चोप्राचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती नेट ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. तिने या लूकबरोबर केसाचे पोनीटेल बनवले असून हाय हिल्स घातल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शिवाय तिच्या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोलही केलं आहे.
‘ही उर्फीची बहीण कुल्फी आहे’, ‘एक उर्फी सहन होत नाही, आता दुसरी आली’, ‘सर्वांना उर्फी बनायचंय’, ‘उर्फीशी स्पर्धा करायला नवं कार्टून आलंय मार्केटमध्ये’, ‘हा ड्रेस हिच्या आधी उर्फीने घातला होता,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

‘या देशात लक्ष वेधण्यासाठी लोक या गोष्टी घालतात,’ असं म्हणत काहींनी संताप व्यक्त केला आहे.

साक्षी चोप्राला सोशल मीडियाची सेन्सेशन म्हणून ओळखली जाते. ती एक गायिका देखील आहे आणि तिचे स्वतःचे युट्यूब चॅनल चालवते. तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ती ‘रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांची पणती आहे. रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांची मुलगी मीनाक्षी हिची ती मुलगी आहे.