चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांच्या विरोधात लैंगिक छळाचे आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोषवर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. या लोकांनी तिच्यावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला. या विषयी पायलने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले होते. त्यानंतर आता आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पायलला संरक्षण देण्याची मागणी करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

रामदास आठवले यांनी पायलला संरक्षण देण्याची मागणी करणारे एक ट्वीट केले आहे. ‘अभिनेत्री पायल घोषवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे. पायल यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे. आज मी पायल घोष यांना भेटलो आणि त्यांच्या स्थितीबद्दल जाणून घेतले’, असे रामदास आठवले यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पायल ही ऑक्टोबर २०२० पासून रामदास आठवले यांच्या पक्षात सक्रिय आहे. पायल ही महिला शाखेची उपाध्यक्ष आहे.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

पायलने या आधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने या संपूर्ण घटनेविषयी सांगितले होते. जेव्हा ती तिच्या गाडीत बसत होती, तेव्हा काही पुरुषांनी तिच्यावर रॉडने हल्ला केला आणि त्यांच्या हातात एक बाटली होती ज्यावर ते अ‍ॅसिड असल्याचा संशय तिला होता.

आणखी वाचा : कियारा आडवाणीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच करणार लग्न? अभिनेत्याने सांगितला प्लॅन

पायल म्हणाली, ‘मी रात्री १० नंतर औषध घेण्यासाठी बाहेर गेले होते. मी माझ्या ड्रायव्हिंग सीटवर होते आणि काही लोक मास्क घालून आले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले, मी घाबरले आणि मी ओरडले आणि रॉड माझ्या हातावर पडला, त्यांच्या हातात असलेल्या बाटलीत अ‍ॅसिड होते. मी या सगळ्यातून बाहेर पडू शकत नाही, हा एक प्रकारे मानसिक आघात आहे. देवाचे आभार आहे की हे सगळं सार्वजनिक ठिकाणी झालं आणि मी ओरडले त्यानंतर ते लोक घाबरले आणि पळाले. मी रात्रभर झोपू शकली नाही.’