पडद्यावर दिसणारे कलाकार विविध माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल, कुटुंबाबद्दल मुलाखती तसेच सोशल मीडियावरील पोस्ट या माध्यमातून प्रेक्षकांच्या माहिती मिळत असते. तसेच, त्यांच्या रिलेनशनशिपमुळे, लग्न, घटस्फोट या गोष्टींमुळेदेखील ते कायमच चर्चेत असतात.
आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या एका रिलेशनशिपच्या अनेक चर्चा झाल्या. अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. ही अभिनेत्री ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासाठी ती ओळखली जाते.
अभिनेत्री विवाहित चित्रपट निर्मात्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती अन्…
करिअरमध्ये अभिनेत्रीला यश मिळाले असले तरी तिला खासगी आयुष्यात मात्र मोठ्या प्रमाणात चढ-उताराचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील राम्या कृष्णन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
‘डीएनए’ आणि ‘बॉलीवूड शादी’नुसार लोकप्रिय चित्रपट निर्माते एस. रविकुमार यांच्याबरोबर राम्या कृष्णन रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्यात जवळीक वाढली. मात्र, रविकुमार यांचे आधीच लग्न झाले होते.
राम्या कृष्णन गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. लग्नाआधीच गर्भवती असल्याने राम्याच्या अडचणी वाढल्या. रिपोर्टनुसार, रविकुमार यांनी राम्याला गर्भपात करण्यास सांगितले. राम्याने सुद्धा करिअर वाचवण्यासाठी आणि कुटुंबाच्या दबावामुळे गर्भपात केला होता. असेही म्हटले जाते की राम्याने रविकुमार यांच्याकडून गर्भपात करण्यासाठी ७५ लाख घेतले होते.
राम्या कृष्णन त्यानंतर कृष्णा वामसी यांच्या प्रेमात पडली. २००५ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे. त्यानंतर राम्या कृष्णनने पुन्हा करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली. आजही अभिनेत्री विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. मात्र, या सगळ्यात तिच्या एका भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळली. अभिनेत्रीची शिवगामी ही भूमिका चांगलीच गाजली होती.
एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ हा सिनेमा २०१५ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता प्रभास सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसला होता. तसेच, अनुष्का शेट्टीदेखील सिनेमात प्रमुख भूमिकेत होती. याबरोबरच, राम्या कृष्णनदेखील बाहुबलीमध्ये शिवगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. तसेच, बाहुबली २ मध्येदेखील ती दिसली होती.
