राणा दग्गुबाती आणि त्रिशा कृष्णन यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. त्यांच्या नात्याची चर्चा होण्यापूर्वीपासूनच दोघेही चांगले मित्र होते. दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल फारसं सार्वजनिकपणे बोलणं टाळलं. राणाने त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं.
राणा आणि त्रिशाच्या नात्याचा विषय ‘कॉफी विथ करण सीझन ६’च्या रॅपिड-फायर राउंडदरम्यान करण जोहरने काढला असता. ‘बाहुबली’ फेम राणाने दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं. मात्र, त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आल्यानंतर त्याने याबाबत फारसं काही बोलणं टाळलं.
आम्ही एकमेकांना डेट केलं – राणा दग्गुबाती
रॅपिड-फायर राउंडदरम्यान करण जोहरने राणा आणि त्रिशाच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला. यावर ‘बाहुबली’ फेम राणाने दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं. त्यांच्या नात्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती गेल्या दशकभरापासून माझी मैत्रीण आहे. आम्ही खूप वर्षांपासून मित्र आहोत आणि एकमेकांना डेटही केलं होतं. पण, मला वाटतं आमचं नातं पुढे जाऊ शकलं नाही.” राणाच्या या वक्तव्यातून त्यांच्या नात्याबद्दलची फारशी माहिती समोर आली नाही, मात्र नातं संपल्यानंतरही दोघांची मैत्री कायम राहिल्याचं स्पष्ट झालं. त्रिशाने नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीयता राखली आहे आणि या नात्याबद्दल तिने सार्वजनिकपणे सविस्तर भाष्य केलेलं नाही.

राणा आणि त्रिशाची मैत्री अनेक वर्षांपासून होती. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूप प्रेमसंबंधात बदलल्याचं म्हटलं जातं. दोघांना अनेकदा एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावेळी दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं भाष्य केलं नव्हतं.

राणाने ऑगस्ट २०२० मध्ये मिहिका बजाजबरोबर लग्न केलं. दरम्यान, त्रिशाने तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करताना वैयक्तिक आयुष्याबाबत तुलनेने गोपनीयता राखली आहे. राणाने त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल मोकळेपणाने, मात्र थोडक्यात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचं नातं पुन्हा चर्चेत आलं.
