scorecardresearch

VIDEO : लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले रणबीर-आलिया, एकदम साधा लूक आला समोर

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

alia bhatt ranbir kapoor spotted together, alia ranbir video viral
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सेलिब्रिटी कपल नेहमीच चर्चेत असतं. बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटी कपलच्या यादीमध्ये आता या दोघांचं ही नाव सामिल झालं आहे. दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे प्रत्येकवेळी आपल्याला दिसून आलं आहे. आलिया तर रणबीरवर आपलं असणारं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसते. दोघांचा विवाहसोहळा म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज होतं. लग्नानंतर दोघंही आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. आता या दोघांचा एकत्रित एक व्हिडीओ समोर आला आहे.

एका चित्रीकरणाच्या लोकशनचा हा व्हिडीओ आहे. रणबीर आणि आलिया चित्रीकरण संपवून बाहेर पडत असताना दोघांना एकत्र पाहण्यात आलं. पण दोघं कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या व्हिडीओमध्ये रणबीरने काळ्या रंगाचं टि-शर्ट, त्याच रंगाची प्रिंटेट पँट तर आलियाने ग्रे रंगाचं शर्ट आणि पँट परिधान केलेली दिसत आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीला झालंय काय? ब्लाऊज न घालताच नेसली साडी, नेटकरी म्हणाले…

चित्रीकरणानंतर बाहेर येत दोघांनीही फोटोसाठी पोझ दिली. तसेच लग्नानंतर या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायला मिळाला. दोघांचा एकत्रित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बेस्ट कपल म्हणून अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. गेली काही वर्ष रणबीर-आलिया एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – VIDEO : नोरा फतेहीवर आली दुचाकीवरुन प्रवास करण्याची वेळ, पाहा नेमकं काय घडलं?

लग्नानंतर मात्र हे सेलिब्रिटी कपल त्यांच्या कामामध्ये व्यस्त झालं आहे. दोघंही आपापल्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. आलिया सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. तर रणबीर ‘एनिमल’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor and alia bhatt spotted together after marriage video viral on social media kmd

ताज्या बातम्या