कतरिना कैफबरोबर परदेशात गेला होता रणबीर कपूर, अफेअरदरम्यानचे 'ते' खासगी फोटो व्हायरल झाले अन्... | ranbir kapoor birthday actor and katrina kaif private vacation photos goes viral on social media see details | Loksatta

कतरिना कैफबरोबर परदेशात गेला होता रणबीर कपूर, अफेअरदरम्यानचे ‘ते’ खासगी फोटो व्हायरल झाले अन्…

कतरिना कैफबरोबर परदेशात गेला होता रणबीर कपूर, अफेअरदरम्यानचे ‘ते’ खासगी फोटो व्हायरल

कतरिना कैफबरोबर परदेशात गेला होता रणबीर कपूर, अफेअरदरम्यानचे ‘ते’ खासगी फोटो व्हायरल झाले अन्…
कतरिना कैफबरोबर परदेशात गेला होता रणबीर कपूर, अफेअरदरम्यानचे 'ते' खासगी फोटो व्हायरल

रणबीर कपूरचा आज ४०वा वाढदिवस. रणबीरवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रणबीर त्याच्या सुखी संसारामध्ये रमला आहे. अभिनेता त्याच्या कामामुळे सतत चर्चेत असतो. पण त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. दीपिका पदुकोणबरोबर त्याचं असलेलं नातं तर प्रचंड गाजलं. शिवाय कतरिना कैफलाही तो डेट करत होता. रणबीर-कतरिनाचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी वाचा – दोन लग्न, चौथ्याच व्यक्तीशी अफेअर अन्…; बिपाशा बासूच्या नवऱ्याला पूर्वाश्रमीच्या पत्नीने मारली होती कानाखाली

दीपिकाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाशी रणबीरची जवळीक वाढली. जवळपास सहा वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. इतकंच नव्हे तर लिव्ह इनमध्येही रणबीर-कतरिनाने राहायला सुरुवात केली होती. मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि रणबीर-कतरिनाचं ब्रेकअप झालं.

रणबीर-कतरिनाचं नातं कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. हे दोघं एकमेकांना डेट करत असताना त्यांचे व्हॅकेशनदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. व्हॅकेशनसाठी इबिजा येथे हे दोघं गेले असता कतरिना आणि त्याचे काही खासगी फोटो सगळ्यांसमोर आले. या फोटोंमध्ये कतरिनाचा बिकीनी लूक पाहायला मिळाला होता.

फोटो लीक झाल्यानंतर कतरिनाने यावर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “फोटो व्हायरल झाले याबाबत मी नाराज आहे. मला थोडा एकांत हवा होता. माझ्या खासगी व्हॅकेशनचे फोटो काढण्याचा तुमचा काही प्लॅन असेल तर मला आधी सांगा. जेणेकरून मी मॅचिंग कपडे परिधान करेन. कारण पांढऱ्या व लाल रंगाची बिकनी मॅचिंग नाही हे मला माहित आहे. पुढच्यावेळी मी मॅचिंग कपडे परिधान करेन.” रणबीर-कतरिनाचे हे फोटो टॉक ऑफ द टाऊन ठरले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 12:30 IST
Next Story
प्रियांका पाठोपाठ कतरिना कैफही आत्मचरित्र लिहिण्याच्या तयारीत, ‘या’ व्यक्तींबद्दल करणार मोठे खुलासे