महाराष्ट्रात सिनेगृह खुले करण्याची घोषणा होताच अनेक बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करण्यात आल्या आहेत. यातच यशराज फिल्म निर्मित रणबीर कपूरच्या ‘शेमशेरा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. पुढील वर्षा १८ मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर सोबतच संजय दत्त आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर मंगळवारी रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्ताने यशराज फिल्मने सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टरमध्ये रणबीरचा सिनेमातील फर्स्ट लूक पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये रणबीरचा अर्धा चेहरा दिसतोय. यात त्याचे केस लांब असल्याचं दिसून येतंय. या पोस्टरवरून रणबीरचा कधीही न पाहिलेला लूक प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं लक्षात येतंय.

“म्हणूनच तर त्यांच्या आवाजाला वय नाही”; राज ठाकरेंनी लता दीदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

हे पोस्टर शेअर करत “लीजेंड आपली निशाणी सोडणार” अशा आशयाचं कॅप्शन देण्यात आलंय. या सिनेमा एक परियड ड्रामा असल्याचं म्हंटलं जातंय. करोना महामारीमुळे २०२० सालामध्ये या सिनेमाचं शूटिंग बंद पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यामुळे वर्षभरापूर्वीच रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर २०२२ सालीत मार्चमध्ये ‘शमशेरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘शमशेरा’सोबतच येत्या वर्षात रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा प्रदर्शित होवू शकतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor first look from shamshera goes viral kpw
First published on: 28-09-2021 at 18:50 IST