scorecardresearch

PHOTO : रणबीर-कतरिनाचा न्यूड फोटो झाला व्हायरल

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.

ranbir kapoor, katrina kaif
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर आणि फिटनेससाठी नावाजली जाणारी अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ब्रेक अप होऊन बराच काळ लोटला. तरीही हे दोघं एकत्र आले की त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण येते. सध्या या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेता रणबीर कपूर ranbir kapoor आणि कतरीना कैफ katrina kaif हे एका रिक्षात बसलेले असून ते यात न्यूड दिसतात.

वाचा : भारत हा एक वाईट देश, वीणा मलिक बरळली

रणबीर आणि कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. यामुळे विविध प्रश्नांना फाटे फुटले आहेत. पण, तुमच्या डोक्यात काहीही चुकीचे येण्या आधीच त्यामागचं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा फोटो रणबीर – कतरिनाच्या रिअल लाइफमधला नसून रील लाइफमधील आहे.  त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटातील  हा फोटो आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटातील हे एक दृश्य असल्याचं कळतं. हा फोटो पाहता  रणबीर आणि कतरिना हे एखाद्या कठीण प्रसंगात अडकल्याचं दिसतं.

ranbir-and-kat

कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपनंतरचा ‘जग्गा जासूस’ हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता पाहावयास मिळतेय. सध्या ‘सिंगल’ स्टेटस असलेल्या रणबीरने ‘जिच्यावर प्रेम करेन तिच्याशीच लग्न करेन’ असे वक्तव्य करून सर्वांच्याच नजरा त्याच्याकडे वळवल्या आहेत. दरम्यान, त्याची आई नीतू कपूर त्याच्यासाठी सुयोग्य वधू शोधण्यासाठी खास लंडनला गेली असल्याची चर्चा सिनेवर्तुळात होती. लंडनस्थित कुटुंबियांना भेटून रणबीरच्या लग्नाचा विचार सध्या त्याचे कुटुंबिय करत आहेत. मात्र अजूनपर्यंत काहीच निश्चित करण्यात आलेले नाही. कपूर कुटुंबियांच्या निकटवर्तीयांपैकी एकाने सांगितले की, ‘रणबीरच्या नातेवाईकांनी त्याला आई- बाबांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिलाय. आश्चर्य म्हणजे त्यानेही त्यांचा हा निर्णय मान्य केला आहे.’

वाचा : हॉलिवूडच्या हिरोचे मराठीत पदार्पण

या चर्चांविषयी रणबीरला विचारले असता तो म्हणाला की, ‘मी लग्न करेन तेव्हा ते सगळ्यांना कळेलच. सध्या माझी आई माझ्यासाठी लंडनमध्ये जाऊन मुलगी शोधतेय अशा चर्चा सुरू आहेत. पण त्यात काही तथ्य नाही. माझ्या पालकांनी किंवा माझ्या आजीने मी लवकर लग्न करावं यासाठी अजिबात जबरदस्ती केलेली नाही. मी लग्न कोणाशी करावं आणि कधी करावं याचा निर्णय माझ्या पालकांनी माझ्यावरच सोडला आहे. मी अशा मुलीशी लग्न करेन जिच्यावर माझं प्रेम आहे.’

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor katrina kaif nude photo from jagga jasoos get viral

ताज्या बातम्या