Video: ‘त्याच्याशी लग्न करु नकोस’, रणबीरच्या ‘त्या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी दिला आलियाला सल्ला

एका कार्यक्रमातील रणबीर आणि आलियाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून नेटकरी संतापले आहेत.

ranbir kapoor, alia bhatt, ranbir gets trolled, ranbir kapoor video, alia bhatt, alia bhatt video,

बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके आणि आवडते कपल म्हणजे अभिनेता रणबीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट. ते दोघेही लवकर लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच त्यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी आलियाला रणबीरशी लग्न करु नकोस असा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा दिवाळीतील एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात रणबीर आणि कतरिना कैफ एकत्र दिसले होते. याच कार्यक्रमातील आलिया आणि रणबीरचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया स्टेजवरुन खाली उतरत असते. रणबीर तिच्या मागेच असतो. तेव्हा आलियाचा लेहेंग रणबीरच्या पायात अडकतो. तो हाताने बाजूला करण्याऐवजी पायाने उडवतो. त्याचे हे कृत्य पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
आणखी वाचा : रणवीर सिंग ते आदिनाथ कोठारे; ’83’मध्ये भारतीय संघ म्हणून मैदानात उतरणाऱ्या कलाकारांची ‘टीम’ पाहिलीत का?

त्यानंतर रणबीर आणि आलिया फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी रणबीरला ट्रोल केले आहे.

एका यूजरने ‘तू रणबीरशी लग्न करु नकोस. तो तुला चांगली वागणूक देणार नाही. मला तुझ्यासाठी वाईट वाटत आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हे वागणे चुकीचे आहे. असे पुरुष कधीही महिलांचा आदर करत नाहीत. तो त्याच्या आईचा आदर करत असेल तरी बास आहे’ असे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranbir kapoor kicked alia bhatt lehenga netizens asked her not to marry him video viral avb

ताज्या बातम्या