scorecardresearch

गरोदर आलियाची खिल्ली उडवणाऱ्या रणबीरला नेटकऱ्यांनी सुनावलं; पाहा नेमकं काय घडलं

आलियाची अशाप्रकारे खिल्ली उडवल्याने रणबीर ट्रोल होतोय.

गरोदर आलियाची खिल्ली उडवणाऱ्या रणबीरला नेटकऱ्यांनी सुनावलं; पाहा नेमकं काय घडलं
तो गरोदर असलेल्या आलियाची खिल्ली उडवताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बी-टाऊनच्या लोकप्रिय जोडीपैकी एक मानले जातात. लवकरच हे दोघं ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. रणबीर आणि आलिया सध्या अयान मुखर्जीसह चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात आलिया आणि रणबीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो गरोदर असलेल्या आलियाची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावरून आता त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चं सगळीकडे शूटिंग का करत नाहीये याचं कारण सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर म्हणतो, “या चित्रपटाची घोषणा जवळपास ४ वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे.” रणबीर बोलत असतानाच मध्येच आलिया म्हणते, “आम्ही प्रमोशन करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत. पण प्रश्न हा आहे की आम्ही सगळीकडे का गेलेलो नाही. (हम हर जगह फैले क्यों नहीं हैं?)” आलियाच्या या बोलण्यावर रणबीरनं तिची खिल्ली उडवली. तो जे म्हणाला ते ऐकल्यावर सर्वच हैराण झाले आहेत.
आणखी वाचा- “ज्यांनी गर्भवतीवर बलात्कार केला…” बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर जावेद अख्तर संतापले

रणबीर कपूर आलियाच्या बेबी बंपकडे पाहत म्हणाला, “अशी एक व्यक्ती आहे जी पसरली आहे. (वैसे कोई है जो फैल गया है)” रणबीरचं हे बोलणं ऐकून आलियाही त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. अर्थात रणबीरने आलियाला हे मस्करीत म्हटलं असलं तरीही नेटकऱ्यांना मात्र त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. आलियाच्या गरोदरपणा आणि वाढलेल्या वजनाची अशा प्रकारे खिल्ली उडवलेली पाहून युजर्सनी रणबीर कपूरला चांगलंच सुनावलं.

आणखी वाचा- “बेबीबंप आणि बाळाची काळजी कशी घेणार यावर चर्चा करणं थांबवा”, आलिया भट्ट ट्रोलर्सवर संतापली

रणबीर कपूरची ही मस्करी सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडलेली नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. एका युजरने व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “हे पहा आलिया आणि रणबीरच्या अशा वागण्यावर नेहमी बोलणं मला आवडत नाही. पण त्याची ही कमेंट मला अजिबात आवडलेली नाही. ती गरोदर आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “तिच्या गरदोरपणाचा असा विनोद करणं अजिबातच विनोदी नाही.” आणखी एका युजरने कमेंट करताना म्हटलंय, “कोणत्याही स्त्रीचं गरोदरपणात वाढलेलं वजन खिल्ली उडवण्याचा विषय असू शकत नाही. ती अगोदरच यामुळे तणावात असते.”

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या