राजकुमार हिरानीच्या 'संजू'नंतर प्रसिद्धीझोतात असलेल्या अभिनेता रणबीर कपूरकडे सध्या अनेक चित्रपट दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे 'संजू'मध्ये त्याने केलेला अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडला असून त्याच्या फॅनफॉलोअर्सची संख्यादेखील झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे रणबीर आता चित्रपटांची किंवा जाहिरातींची निवड करताना विशेष काळजी घेत असल्याचं दिसून येतं. सध्या रणबीरचा असाच एक फोटो व्हायरल झाला असून यात त्याला नव्या अंदाजात पाहायला मिळत आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेल्या रणबीर एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं आहे. त्याचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून रणबीरने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हे फोटो शेअर केले आहेत. Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Follow @ranbirkapoor_fans_zone Also like comment share #ranbir #ranbirkapoor #ranbirkapoorfans #ranbir_kapoor #ranbirfan #songs #ranbirkapoorlove #anushkasharma #superstar #bollywood #rockstar #superstar #jaggajasoos #dashing #handsome #rkdp #randeep #deepikapadukon #follow4follow #yjhd #bollywoodactor #katrinakaif #karanjohar #aliabhatt #bramhashtr #friendship #girlfriend #anushkasharma #aedilhaimushkil #tamasha #sanju A post shared by RanbirKapoor_Fans_Zone (@ranbirkapoor_fans_zone) on Aug 1, 2018 at 11:44pm PDT व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रणबीर एका वयस्क व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत असून त्याला ओळखणं अशक्य असल्याचं पाहायला मिळतं. यात त्याने फ्रेंच कटची दाढी ठेवली आहे. त्यामुळे एक रुबाबदार वयस्क व्यक्ती असल्याचा भास निर्माण होतो. #RanbirKapoor can transform himself into anything and these pictures are proof! Follow @bollywood_info___ #bollywoodinfo #bollywood A post shared by bollywood info (@bollywood_info___) on Aug 1, 2018 at 11:39pm PDT दरम्यान, रणबीरने आणखी एक फोटो शेअर केला असून हा फोटोदेखील एका जाहिरातीसाठी काढण्यात आला आहे. यामध्ये तो एक तरुण तडफदार सेल्समन आहे. ही जाहिरात एका गाडीच्या कंपनीची असून यापूर्वीही या कंपनीबरोबर रणबीरने काम केलं आहे. 'संजू'च्या बक्कळ कमाईनंतर रणबीरचं नाव सध्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रणबीरने आपल्याबरोबर काम करावं यासाठी दिग्दर्शक आणि कंपन्यांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतं.