VIDEO: आलिया प्रेग्नंट, फोटोग्राफर्सकडून रणबीरला शुभेच्छा; अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

रणबीर कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO: आलिया प्रेग्नंट, फोटोग्राफर्सकडून रणबीरला शुभेच्छा; अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत
रणबीरचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. एकीकडे त्याचे चित्रपट एकामागोमाग एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरची पत्नी आलिया भट्टनं आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर रणबीरवर सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनच्या वेळचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होत आहे. सध्या रणबीर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमधून निघत असताना रणबीरचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स रणबीरला बाबा होणार असल्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. पण यातील रणबीरची प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे. रणबीरचा हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नलिस्ट मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आलिया भट्टनं २७ जूनला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर रणबीर आणि आलियावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. त्यानंतर आता जेव्हा काही फोटोग्राफर्सनी रणबीरला शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यानं लगेचच त्यांना मजेदार प्रतिक्रिया दिली. क्षणाचाही विलंब न लावता रणबीर त्या फोटोग्राफर्सना उद्देशून म्हणाला, “तू काका झालास, तू मामा झालास” रणबीरच्या अशा प्रतिक्रियेवर अनेकांनी धम्माल कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- ‘कॉफी विथ करण’ शो का होतो सुपरहिट? करण जोहरनं केला खुलासा, म्हणाला “ट्रोलिंग…”

दरम्यान रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘शमशेरा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता संजय दत्तची देखील यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया- रणबीर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
क्रिती सेननला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना, नेटकरी म्हणाले, “ही तर वरपासून खालपर्यंत…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी