ranbir kapoor reveal about alia bhatt annoying habit of sleeping | "आलिया बेडवर..." रणबीर कपूरने केला बायकोच्या 'या' सवयीचा खुलासा | Loksatta

“आलिया बेडवर…” रणबीर कपूरने केला बायकोच्या ‘या’ सवयीचा खुलासा

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई- बाबा होणार आहेत.

“आलिया बेडवर…” रणबीर कपूरने केला बायकोच्या ‘या’ सवयीचा खुलासा
रणबीर कपूरने त्याच्या आणि आलियाच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांचा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघंही वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये चित्रपटाविषयी तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोलताना दिसले. आताही एका मुलाखतीत रणबीर कपूरने त्याच्या आणि आलियाच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने त्याची पत्नी आलिया भट्टच्या एका विचित्र सवयीबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “आलियाची झोपण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. ती बेडवर संपूर्ण रात्रभर गोल गोल फिरत राहते आणि त्यामुळे मला बेडच्या एका कोपऱ्यात झोपावं लागतं. बेड कितीही मोठा असला तरी मला मात्र कोपऱ्यातच झोपावं लागतं. तिच्या या सवयीला मी खूप वैतागलो आहे. हे मला रोज सहन करावं लागतं.”

आणखी वाचा- “मला अनुभव आहे व्हिस्कीनंतर ट्विटर…” कपिल शर्माचा चियान विक्रमला खास सल्ला

या मुलाखतीत आलियानेही रणबीरच्या अशा एका सवयीबद्दल सांगितलं जी तिला आवडत नाही. ती म्हणाली, “जेव्हा मी काही बोलत असते रणबीर शांतपणे सगळं ऐकून घेतो. ही त्याच्याबाबत खूपच खास गोष्ट आहे. पण मला वाटतं अनेकदा ज्या ठिकाणी त्याने काही बोलायची गरज असते. तेव्हाही तो शांत राहतो. अशावेळी त्याचं शांत राहाणं मला त्रासदायक वाटतं.” दरम्यान या मुलाखतीत आलिया आणि रणबीरने एकमेकांबद्दल बरीच सीक्रेट्स उघड केली.

आणखी वाचा- “तुझा अभिमान वाटतो…” नेटकऱ्यांकडून आलिया भट्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत बोलायचं तर बॉयकॉट ट्रेंडनंतर या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटात आलिया आण रणबीर यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा पुढील भाग २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये कारण…” अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताने केला खुलासा

संबंधित बातम्या

“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू
पुणे: एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी; ४४२ महाविद्यालयात खास शिबिरे
“पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर