रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद | ranbir kapoor sanjay dutt movie shamshera box office collection day 2 audience response see details | Loksatta

रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद

अभिनेता रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा फार कमी प्रतिसाद मिळाला आहे.

रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद
अभिनेता रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा फार कमी प्रतिसाद मिळाला होता.

अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kpoor) बहुचर्चित ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपटाचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरची झलक आणि चित्रपटाची भव्यदिव्यता पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस शुक्रवारी (२२ जुलै) चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालणार असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. ‘शमशेरा’ला बॉक्स ऑफिसवर काहीसा थंड प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा – रणवीर सिंगचा न्यूड लूक पाहून नेटकरी सुसाट, मजेशीर कमेंट वाचून तुम्हालाही हसू होईल अनावर

गेल्या काही महिन्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपट अपयशी ठरले. ‘शमशेरा’ची झलक पाहून बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आता बदलणार असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र या चित्रपटाच्या पदरी अपयश आलं आहे. रणबीरच्या ‘शमशेरा’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १० कोटी रुपये कमाई केली. ही कमाई इतर सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी आहे. विकेण्डला हा चित्रपट तुफान चालणार असा अंदाज होता.

मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. शनिवारी (२४ जुलै) देखील चित्रपटाने फक्त ९ ते १० कोटी रुपयांच्या घरात बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावला. म्हणजेच ‘शमशेरा’ने एकूण २० कोटी रुपये कमाई केली. या चित्रपटाच्या तुलनेत ‘भुल भुलैय्या २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १४ कोटी रुपये कमाई केली होती. रणबीर जवळपास ४ वर्षांनी रुपेरी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर परतला.

आणखी वाचा – “तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण…” अभिनेता रितेश देशमुख स्पष्टच बोलला

पण रणबीरची जादू मात्र फिकी पडली असंच म्हणावं लागेल. ‘शमशेरा’मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्यामध्ये बरेच एक्शन सीन आहेत. यातील काही तर घोड्यावर बसून शूट करण्यात आले आहेत आणि त्यासाठी रणबीरनं घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण मल्होत्रानं केलं आहे. तसेच चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Ananya Movie Review : एका जिद्दीची कहाणी

संबंधित बातम्या

“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
“मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
जितेंद्र जोशीची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट; म्हणाला, “काका तू कायम राहणार आहेस…”
“काका तू रडायचास…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली ‘ती’ जुनी आठवण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
“मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली
FIFA World Cup 2022: ‘एमबाप्पे हा एक उत्कृष्ट खेळाडू’, प्रशिक्षक डेशॅम्प्स यांनी डेन्मार्कच्या सामन्यानंतर केला कौतुकाचा वर्षाव
‘सरकारला साहित्यिकांची भीती म्हणूनच त्यांनी द्वादशीवारांना डावलले’; प्रभा गणोरकर यांची साहित्य क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेपावरुन टीका
प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”