Shamshera Trailer : ‘शमशेरा’चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित, रणबीर कपूर, संजय दत्तने वेधलं साऱ्यांचं लक्ष

रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Sanjay Dutt, Ranbir Kapoor, Vaani Kapoor, Shamshera, Shamshera Trailer, sanjay dutt
रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'शमशेरा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शमशेरा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टीझरमुळे ‘शमशेरा’बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस ‘शमशेरा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर एक तासामध्येच १ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘शमशेरा’च्याच ट्रेलरची चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – “शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी…” हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा

लांबसडक दाढी, वाढलेले केस, हातात कुऱ्हाड आणि चेहऱ्यावरचे हावभाव असा रणबीर कपूरचा ट्रेलरमधील अंदाज विशेष लक्षवेधी आहे. त्याचबरोबरीने अभिनेता संजय दत्तचा लूकही अगदी कमालीचा आहे. संजय दत्तचा कधीही न पाहिलेला लूक आणि भूमिका या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. संजू बाबाने याआधीही रुपेरी पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारली. पण या चित्रपटामधील त्याची भूमिका काहीशी वेगळी असल्याचं पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

अभिनेत्री वाणी कपूर या चित्रपटामध्ये सोना हे पात्र साकारताना दिसणार आहे. सोना आणि शमशेराची प्रेमकथा या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. ‘शमशेरा’ची कथा १८०० दशकामधील आहे. इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळवण्यासाठी सुरु असलेली लढाई या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आणखी वाचा – ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”

विशेष म्हणजे ‘संजू’ चित्रपटानंतर रणबीर जवळपास चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. शिवाय याआधी रणबीरला प्रेक्षकांनी प्रेमकथेवर आधारित चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. ‘शमशेरा’ रणबीरसाठीही तितकाच महत्त्वाचा चित्रपट आहे. यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्राने केलं आहे. चित्रपटाचं चित्रीकरण लडाखमध्ये करण्यात आलं आहे. येत्या २२ जुलैला ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor sanjay dutt vani kapoor movie shamshera trailer release 1 million views in few hours kmd

Next Story
“…तर आम्ही भाजपावाले आणि देवेंद्र फडणवीस”, किचन कल्लाकारमध्ये रामदास आठवलेंनी दिला अजित पवारांना सल्ला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी